करमाळाक्राइमसोलापूर जिल्हा

करमाळयासह इतर सहा तालुक्यांमध्ये तब्बल बारा मोटरसायकली चोरणाऱ्या अट्टल चोरांना करमाळा पोलिसांनी घातल्या बेड्या

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळयासह इतर सहा तालुक्यांमध्ये तब्बल बारा मोटरसायकली चोरणाऱ्या अट्टल चोरांना करमाळा पोलिसांनी घातल्या बेड्या

करमाळा(प्रतिनिधी); करमाळा पोलिसांनी धडाकेबाज मोठी कारवाई केली असून करमाळा शहर तसेच परिसरातील तब्बल 12 मोटरसायकली चोरणाऱ्या अट्टल ऊसतोड कामगाराला मोठ्या शिताफीने अटक केली आहे सदरची करमाळा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दोन चोरट्यांना पकडले असून त्यांना अटक करत चार लाख 90 हजाराच्या १२ मोटरसायकली ताब्यात घेतल्या आहेत.

नितीन काळूराम माळी (रा. चांडगाव, ता. श्रीगोंदा, जि. नगर) व विजय गोरख गायकवाड (रा. मुरकुटवाडी, ता. कर्जत, जि. नगर) अशी संबंधित संशयित गुन्हेगारांची नावे आहेत.

त्यांच्याकडून ताब्यात घेणाऱ्या घेण्यात आलेल्या मोटरसायकलींबाबत करमाळा पोलिस ठाण्यात -तीन, कर्जत पोलिस ठाण्यात एक, सांगोला पोलिस ठाण्यात एक, फलटण पोलिस ठाण्यात एक, अहमदनगर पोलिस ठाण्यात दोन, चिखली पुणे पोलिस ठाण्यात एक, सिन्नर पोलिस ठाण्यात एक, बारामती पोलिस ठाण्यात एक अशा 12 मोटरसायकलींबाबत गुन्हे दाखल आहेत.

संशयित आरोपींनी चोरी केल्याबाबत कबुली दिली आहे. ते ऊसतोड कामगार असून गावात पाळत ठेवून रात्री मोटरसायकल चोरी करत होते. मोटरसायकलचा हॅन्डलॉक तोडून ते मोटर सायकल चोरी करत होते.

जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे,

पोलीस कर्मचारी आनंद पवार (मेजर) पोलिस हेडकॉन्स्टेबल अजित उबाळे, पोलिस नाईक चंद्रकांत ढवळे, पोलिस कॉन्स्टेबल तौफिक काझी, सोमनाथ जगताप, अमोल जगताप व गणेश शिंदे यांनी ही कारवाई केली आहे.

litsbros

Comment here