कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत चुरस वाढली; आज पृथ्वीराज पाटील, दिग्विजय बागल, सुनील सावंत यांच्या सह ‘या’ एकूण 61 उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज
जेऊर (प्रतिनिधी) करमाळा तालुक्यातील सहकार क्षेत्राची जननी असणाऱ्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीची चुरस वाढली असून आज आज एकूण 61 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज (गुरुवारी) बागल गटाचे नेते दिग्विजय बागल, पाटील गटाचे युवा नेते पृथ्वीराज पाटील, सावंत गटाचे नेते सुनील सावंत, बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजी बंडगर व शिंदे गटाचे विलास पाटील यांच्यासह ६१ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
तालुक्यातील प्रमुख गटाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याने कोणाची युती व कोणाची आघाडी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोहिते पाटील समर्थक तरटगावचे माजी सरपंच डॉ. अमोल घाडगे व भाजपचे तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे यांनीही अर्ज दाखल केले आहेत.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची १८ संचालकांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आबासाहेब गावडे हे काम पाहत आहेत. तालुक्यातील प्रमुख असलेल्या जगताप, बागल, शिंदे व पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारपर्यंत (ता. ८) मुदत आहे. त्यामुळे आणखी अर्ज दाखल होणार आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी पाटील गटाचे देवानंद बागल यांनीही अर्ज दाखल केला आहे.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या बागल गटाची सत्ता आहे. तर जगताप गट विरोधात या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आज अर्ज दाखल करण्यासाठी बागल गटाचे अनेक कार्यकर्ते एकत्र आले होते.
यामध्ये मकाईचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर, उपसभापती चिंतामणी जगताप, पोथरे येथील शिवरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र झिंजाडे, आदिनाथचे माजी अध्यक्ष धंनजय डोंगरे आदींचा समावेश होता.
बागल गटाचे कार्यकर्ते अर्ज दाखल करून गेल्यानंतर पाटील गटाचे अनेक कार्यकर्ते निवडणूक कार्यालयाकडे आले. यावेळी नवनाथ झोळ, राजाभाऊ कदम, राजन पाटील प्राध्यापक अर्जुनराव सरक दत्तात्रेय सरडे सहित मोहिते पाटील समर्थक अजित तळेकर, शहाजीबापू देशमुख, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, शेखर गाडे आदी उपस्थित होते.
भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, दीपक चव्हाण यांनीही एकत्रित येऊन अर्ज दाखल केला आहे.
यांनी केले अर्ज दाखल
सहकारी संस्था (सर्वसाधारण) : विजयसिंह नवले, दिग्विजय बागल, कल्याण सरडे, शिवाजी बंडगर, अशोक हनपुडे, औदूंबर ढेरे, काशिनाथ काकडे, नवनाथ दुरंदे, दादासाहेब जाधव, देवानंद बागल, पृथ्वीराज पाटील, राहुल गोडगे, वैभव पाटील, रामेश्वर तळेकर, किरण पाटील, संतोष शेळके, दत्ताञय गव्हाणे, रंगनाथ शिंदे, सुनील सावंत, धनंजय डोंगरे, दत्तात्रय बदे, अमरजित साळुंखे व महेशराजे भोसले पाटील. (महिला राखीव) : साधना पवार, सुलन नलवडे, शैलजा मेहेर व सविता माने.
(इतर मागासवर्ग) : शैलजा मेहेर, राजाराम जाधव व रियाज मुलाणी. (भटक्या विमुक्त) : प्रा. शिवाजी बंडगर.
ग्रामपंचायत (सर्वसाधारण) : हरिश्चंद्र झिंजाडे, विलास काटे, विलास पाटील, राजाराम जाधव, काशिनाथ काकडे, रामहरी कुदळे, नवनाथ झोळ, किरण फुंदे, पृथ्वीराज पाटील, जयराम सोरटे, अजित तळेकर, ज्योतीराम नरुटे, संजय तोरमल, रंगनाथ शिंदे, सुनील सावंत, महेशराजे भोसले पाटील, उर्मिला पवार, शहाजी माने, डॉ. अमोल घाडगे, धनराज मोरे, दत्तात्रय बदे व अमरजित साळुंखे.
(एससी) : शहाजी धेंडे, मनीषा कांबळे, बाळू पवार व राजू कदम.
(आर्थिक दुर्बल) : औदूंबर ढेरे, कल्याण सरडे, हनुमंत आवटे व उर्मिला पवार. आदि उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे.
Add Comment