करमाळा राजकारण सोलापूर जिल्हा

करमाळा भाजपा तालुका अध्यक्षपदी काकासाहेब सरडे यांची निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

*करमाळा भाजपा तालुका अध्यक्षपदी काकासाहेब सरडे यांची निवड*

करमाळा प्रतिनिधी – संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडी काल प्रदेश पातळीवरून जाहीर करण्यात आल्या व प्रत्येक तालुक्यामध्ये निवडणूक प्रमुखांनी नवनिर्वाचित तालुका अध्यक्षांना निवडीचे पत्र दिले यामध्ये करमाळा मंडल साठी करंजे गावचे माजी सरपंच काकासाहेब सरडे यांची निवड करण्यात आली आहे, शेलगाव येथील शिवम प्राइड हाॅटेल येथे भारतीय जनता पार्टीच्या बैठकीत त्यांना निवडणूक प्रमुख संदेश काकडे यांनी निवडीचे पत्र देऊन तालुका अध्यक्षपद घोषित केले, तसेच करमाळा ग्रामीण मंडळासाठी सचिन पिसाळ यांची निवड करण्यात आली आहे, या निवडीवेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे उपस्थित होते,


ही निवड झाल्यानंतर काकासाहेब सरडे यांनी बोलताना सांगितले की मी गेली अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे काम करत आहे त्यामुळे माझ्यावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब , कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब , पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब , माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत व आमचे नेते गणेश चिवटे यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तो सार्थ ठरवून तालुक्यातील प्रत्येक गावात भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अविरतपणे काम करणार आहे व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पार्टी सर्व निवडणुकीला सामोरे जाऊन करमाळा तालुका भाजपमय करण्यासाठी येणाऱ्या काळात ताकदीनिशी काम करणार असल्याचे सरडे यांनी सांगितले.

हेही वाचा – ‘करमाळयातील सुपुत्राच्या पुस्तकाचे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळगावी झाले प्रकाशन : कॅबिनेट मंत्री उदय सामंत राज्यमंत्री योगेश कदम यांची होती उपस्थिती!

शहिदांची स्मृती जपणे ही आपली नैतिक जबाबदारी: ॲड. बाळासाहेब मुटके

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अफसर तात्या जाधव, तालुका अध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, भगवान गिरी गोसावी, निवडणूक निर्णय अधिकारी संदेश काकडे, यलपले साहेब, नितीन झिंजाडे, बंडू शिंदे, मोहन शिंदे, डॉ अभिजीत मुरूमकर, सोमनाथ घाडगे, अशोक ढेरे, लक्ष्मण शेंडगे, लक्ष्मण केकान, शुभम बनगर ,अमोल जरांडे, दत्तात्रय पोटे, सागर सरडे, हर्षद गाडे, किरण शिंदे, नाना अनारसे,रंजित पवार, नागनाथ केकान, प्रमोद सोनवने, दिगंबर राखुंडे , कपिल मंडलिक, रविकिरण माळवे, चंद्रशेखर सरडे, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!