करमाळा तालुक्यातील ऊस वाहतूकदार आक्रमक; वाहतुक दरवाढीसाठी निवेदन देत संपावर जाण्याचा पवित्रा
वाशिंबे(प्रतिनिधी): साखर उद्योगात शेतकरी आणि ऊस वाहतूकदार यांची मोठे योगदान आहे.डिझेलच्या दरात झालेली वाढ,वाहनांच्या सुट्टे स्पेअर पार्टचे वाढलेले दुप्पटीने भाव व वाहन चालकांच्या पगारात दरवर्षी होत असलेली वाढ हे सर्व पाहता ऊस वाहतूक दरात अपेक्षित वाढ झालेली नाही.
शिवाय मुकदमांकडून आर्थिक फसवणुकीची वारंवार होणारे प्रकार त्यामुळे ऊस वाहतूकदार पुरता संकटात सापडला आहे.हे लक्षात घेता ऊस वाहतुक दरात ७० टक्के व कमिशन मध्ये ५ टक्के वाढ व्हावी.या मागणीसाठी संपुर्ण वाशिंबे गट वाहतुकदार यांनी अंबालिका शुगर कारखान्याचे वाशिंबे गट ऑफिसचे ॲग्री सुपरवायझर डी.एन.पागीरे सो.यांना निवेदन दिले आहे.
आवाटीचे माजी सरपंच संजय नलावडे उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित
मागण्या मान्य न केल्यास महाराष्ट्र ऊस वाहतुक संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देत आम्ही सर्व ऊस वाहतुक बंद करण्याचा पवित्रा वाहतुकदार घेणार आहेत.असे वाशिंबे गटातील ऊस वाहतुकदार वाहन मालक यांनी सांगितले.
Comment here