करमाळाक्राइमसोलापूर जिल्हा

वडशिवणे येथे एकास पाच जणांनी लोखंडी गजाने केली मारहाण; चारचाकी फोडून रोख रकमेसह सोन्याची चैन काढून घेतल्याची करमाळा पोलिसांत फिर्याद

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

वडशिवणे येथे एकास पाच जणांनी लोखंडी गजाने केली मारहाण; चारचाकी फोडून रोख रकमेसह सोन्याची चैन काढून घेतल्याची करमाळा पोलिसांत फिर्याद

करमाळा (प्रतिनिधी):- टेंभूर्णी येथून आठवडी बाजार करून आपल्या चारचाकीतून परत गावी येताना वडशिवणे येथील एकास गावातीलच पाचजणांनी मिळून मारहाण केली, असून मारहाण करणारांनी खिशातील रकमेसह गळ्यातील चेन काढून नेल्याची फिर्याद करमाळा पोलिसांत दाखल झाली आहे. दि. १७ फेब्रु. रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास वडशिवणे शिवारातील माळीवस्ती येथे हा प्रकार घडला आहे.

याबाबत करमाळा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत दिलीप ब्रम्हदेव काळे, (वय- ४१, रा. वडशिवणे, ता. करमाळा) यांनी म्हटले आहे कि, टेंभूर्णी येथून बाजार करून वडशिवणे गावात स्वतःच्या ईर्टीका कार नं. एम.एच.14- CU-1777 मधून एकटाच गावाकडे पोचलो असताना वडशिवणे शिवारातील माळीवस्ती येथे वडशिवणे गावातीलच भुजंग सिद्धेश्वर कोडलिंगे याने त्याच्या पत्नीसह मोटारसायकलवर येऊन माझ्या चारचाकीला गाडी आडवी लावली.

हेही वाचा – जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी करमाळा तालुक्यातील खडकी येथील दोघांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल

कणेरी मठातील मृत गायींचे रिपोर्टींग करण्यासाठी गेलेले पत्रकारावर हल्ला करणार्‍यांना तत्काळ अटक करा; करमाळा तालुका पत्रकार संघाची मागणी

यावेळी त्यांच्या मागून आणखी तीन अनोळखी इसमही आले. गाडीचा दरवाजा व काच लॉक असल्याने भुजंग कोडलिंगे याने पत्नीकडे असणाऱ्या दोन गजांपैकी एक गज घेऊन त्या गजाने ड्रायव्हर बाजूची काच फोडून गाडीचा दरवाजा उघडला आणि भुजंग आणि त्याच्या पत्नीने मला गाडीबाहेर ओढून, “तू आम्हाला आमचे शेतात जायला यायला रस्ता का देत नाही ?” असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून भुजंगने डोकीत गजाने मारहाण केली तसेच त्याच्या पत्नीने गजाने हातांवर मारहाण करून जखमी केले.

त्याचवेळी त्यांच्यासोबत असलेल्या तीन अनोळखी इसमांनी शिवीगाळ व दमदाटी करत मला खाली पडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर भुजंग कोडलिंगे याने माझ्या गळ्यातील तीन तोळे सोन्याची अंदाजे 90 हजार रुपये किमतीची चैन व खिशातील रोख सहा हजार रुपये जबरीने काढून ते सर्वजण निघून गेले या सर्वांनी मारहाण केल्यामुळे मला सर्वांगावर मुका मार लागल्याने मी थोरला भाऊ बळीराम यास फोन करून सदर ठिकाणी बोलाविल्यानंतर मी बेशुद्ध पडलो यानंतर बळीराम यांनी मला खाजगी गाडीने टेंभुर्णी येथील पाटील हॉस्पिटल येथे ॲडमिट केले आहे.

याबाबत करमाळा पोलिसांत दि. २१/०२/२०२३ रोजी भुजंग सिद्धेश्वर कोडलिंगे, वैशाली भुजंग कोडलिंगे (दोघे रा. वडशिवणे, ता. करमाळा) व अनोळखी तीन इसम यांचे विरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.

litsbros

Comment here