करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

करमाळा भाजपची ग्रामीण भागासाठी पंचायतराज व ग्रामविकास विभागांची स्थापन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा भाजपची ग्रामीण भागासाठी पंचायतराज व ग्रामविकास विभागांची स्थापन

करमाळा: (प्रतिनिधी अलीम शेख); भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्राम विकास विभागाच्या तालुका अध्यक्षपदी नेरले येथील महेशराजे भोसले यांची निवड करण्यात आली असून पश्चिम महाराष्ट्राचे सहसंयोजक निनाद पटवर्धन यांचे हस्ते नियुक्तीचे पत्र दिले.

प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने नव्याने सुरू केलेल्या पंचायत राज व ग्रामविकास या विभागाच्या करमाळा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व आढावा सोलापूर जिल्हा संयोजक दशरथ काळे, करमाळा तालुका प्रभारी विक्रांत शिंदे, सोलापूर जिल्हा सहसंयोजक अमरजीत साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी करमाळा तालुका भाजपा च्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. सोलापूर जिल्हा संयोजक दशरथ काळे, जितेंद्र शिंदे, जिल्हा सहसंयोजक व तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे यांनी कार्याचा आढावा घेत मार्गदर्शन केले.

यावेळी पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख निनाद पटवर्धन यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरापर्यंत जावे, कुटुंबाचे सर्वेक्षण करावे, प्रत्येक कुटुंबामध्ये कोणी एक संबंधित कोणत्याही योजनेचा लाभार्थी मिळणारच आहे. ज्या लाभार्थ्यांना योजना लागू होते त्यांना ती योजना पंचायत राज च्या माध्यमातुन मिळवून द्यावी.

पुढे बोलताना ते म्हणाले की, केंद्र व राज्याच्या साधारणता 1200 च्या आसपास योजना आहेत, अनेक योजना नागरिकां पर्यंत पोहोचत नाहीत, यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन योजनांची माहिती सांगायची आणि यामधून जे लाभार्थी मिळणार आहेत त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून द्यायचा. कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने काम केले तरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येक समाज बांधवांना आत्मनिर्भर करण्याचा संकल्प पूर्ण होणार आहे.

हेही वाचा – नगरला हमाल मापाडी राज्यव्यापी द्वैवार्षिक अधिवेशनासाठी करमाळा येथून कार्यकर्ते मोठ्या संख्येने जाणार: ॲड राहुल सावंत यांची माहिती

** गावातली अंधारी रात्र ** …………………… ( तसं बघायला गेलं तर खास गावरान भाषा )

यावेळी तालुका सहसंयोजक पदी किरण वाळूंजकर, विशाल पाटील, शिवाजी जाधव, दत्तात्रय देशमुख, ज्ञानेश्र्वर खाटमोडे, सोनाली क्षिरसागर यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी करमाळा शहर अध्यक्ष जगदिश आगरवाल, सरचिटणीस शाम सिंधी, नरेंद्रसिंह ठाकुर, नितीन झिंजाडे आदी उपस्थीत होते.

litsbros

Comment here