आम्ही साहित्यिकमहाराष्ट्र

** गावातली अंधारी रात्र ** …………………… ( तसं बघायला गेलं तर खास गावरान भाषा )

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

** गावातली अंधारी रात्र **
……………………
( तसं बघायला गेलं तर खास गावरान भाषा )
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
तसं पाहायला गेलं तर आपण खूप दिवसापासून अस्सल जी ग्रामीण आणि खेडेगाव ची भाषा व वास्तव त्याबद्दल पाहू त्याचं काय झालं आम्ही रहायला होतो करमाळा तालुक्यात पोमलवाडी गाव पोमलवाडी तसं बघायला गेलं तर रेल्वे स्टेशन पण अख्या गावाला माहीती आहे हे सोनाराचं कुटुंब दरवर्षी वातावरण अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो त्यांच्या लेकीकडं मे महिन्याची सुट्टी घालवायला नाशिक जिल्ह्यात जातयं आणि ते पण एप्रिल मध्ये परीक्षा झाल्यावर जायचं आणि दीड महिन्यांनी जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर घ्यायचं म्हणजे साधारण दीड किंवा दोन महिने सुट्टीच्या निमित्ताने तिकडे राहायचं त्यानंतर वर्षभर कुठे सुद्धा जायचं नाही फक्त गेलं तर दौंड रेल्वे दवाखान्यात ती पण दुपारी दोन वाजता जायचं आणि रात्री एक वाजता यायचं असं आमचं होतं मी लहान असताना गावामध्येच मोठ्यांच्या नजरेखाली वावरायचं पण आठवीच्या पुढं थोडीशी समज आल्यावर पुढे चार-पाच वर्षे मी त्या गावी जात होतो ते गाव म्हणजे डोंगरगाव…मालेगाव तालुका उमराण्याच्या जवळ आणि नाशिक जिल्ह्यामध्ये तर त्या गावाच्या आसपासच्या गावांमध्ये म्हणजे उमराणे… सौंदाणे …चिंचवं…डोंगरगाव… दहिवड… आदी भागातून कांदा उत्पादन व्हायचं आमचा मेव्हणाचं दोन ट्रॅक्टर घेऊन शेतकऱ्यांचा कांदा लासलगाव पर्यंत पोहोचतं करायचा
आता बघा तो भाग जरी खानदेश प्रविष्ट असल्यामुळे भाषा अहिराणी असली तरी काही कुटुंब आपली साध्या मराठी भाषेचाच रोज वापर करायचे त्याचं काय झालं माझ्या बहिणीची थोरली जाऊ तिचं नाव सत्यभामा त्यांच्या घरचं हलवाई दुकान होतं थोडी शेती पण होती ती पण बागायत होती ते शेजारीच डोंगरगावला राहायचे आता डोंगरगाव म्हणजे उमराण्यापासून साधारण एक सहा-सात किलोमीटरवर कारण स्वतःची बैलगाडी व त्या बैलगाडी मध्ये चार-पाच बांबूचे वासे आणि तंबू राहुटी आणि मिठाईच्या पराती…पराती काढून घ्याव्या लागायच्या पण बाकीचं सगळं सामान गाडीत तसंच राहायचं ही गाडी घेऊन व हलवाईच्या मिठाईच्या पराती घेऊन आसपासच्या खेडेगावचा बाजार करायचा असा त्यांचा रोजचा व्यवसाय…शेती करायला दिलेली होती आता आमच्या बहिणीच्या दिराचे नाव वसंता कुटुंब सुख-समृद्धीनं नटलेलं पदरात एक पोरगा आणि पोरगी नवरा बायको बाजारात आजूबाजूच्या गावात जाऊन हलवाईच्या मिठाईची विक्री करायचे संसाराचा गाडा ओढत होते बघायं गेलं तर सुखवस्तूचं म्हणांना पण पदरात थोडी शेती असल्यामुळे ते शेतकऱ्यांमध्ये पण मोडायचे शेतकऱ्याला एक तर निसर्ग म्हणजे पावसा पाण्याने केसांनी गळा कापल्या वानी दिसणारे ढग दाटून आलेलं आभाळ कवा गुल होतय की कवा नशीब फिरल साथ दिली काळ्यामातीत हिरवं सोनं आलं तर बाजारातले व्यापारी आणि ऊस कारखानदार भावा बद्दल बोलतात तर पार वाट लावतात एकदा काय झालं.

अमावस्येच्या या भयान राती डोळ्यातली बुब्बूळं काढल्या वाणी सगळीकडे गच्च काळाकुट्ट अंधार गुडुप अंधारानी सगळं डोंगरगाव गिळून टाकलं होतं रस्त्यावर लांबून बॅटरी दाबल्या वाणी फोकस पडला फोकस जवळ जवळ यायला लागला तसं काही नव्हतं त्याचं काय ह्या खाच खळग्याच्या रस्त्यांनी टमटम कशीतरी दारू पिल्याल्या माणसांवानी झोकांड्या खात गावात येत होती आमचा वसंता पण त्या टमटम मध्ये होता गावचा रस्ता तर असा होता एखादी अवघडलेली बाई असेल आणि डिलिव्हरी साठी तिला दवाखान्यात न्यायचं असेल तर तिची रस्त्यातच डिलीवरी होणार म्हणजे होणार तर ती टमटम गावातल्या चौकात थांबली व्हती चौक कसला आपलं ठराविक थांबायचं ठिकाण टमटम उडालेला धुरळा खाली बसवत एखाद्या दमलेल्या म्हाताऱ्या माणसांवानी शांत उभा राहिली त्यातल्या डायव्हरनी गुटख्याच्या दोन पुड्या काढल्या एकत्र मिसळून चांगलं तळहातावर मालीश केली आणि एकदाचा बार भरला असं वाटायचं गाडीत पेट्रोलचं भरलयं
रातभर झोप घुसत नाही अंगात ह्या खड्ड्याच्या रस्त्यामुळे वरवंट्यानी अंग ठेचल्यावानी दुखतं सपनात पण आम्ही बरळतो ए डोंगरगाव sss ए डोंगरगाव sss ड्रायव्हरने त्याची परवड सांगताचं सगळी माणसं फिदीफिदी हसली तर ड्रायव्हर म्हणतयं कसं तुम्हाला हसू येतंय आणि हिथं आम्हाला रडू येतंय ही वडाप चा धंदा करायचा ड्रायव्हरच्या बोलण्यावर माणसं हसत हसत पांगली दहा रुपये आगाव घेतले म्हणून तुम्हाला अवघड वाटलं का पाहुणे पण एवढं करून पण आम्हाला ट्राफिक वाल्या च्या डोंबल्यावर रोज दोनशे रुपये घालावे लागतात तुमचं पण आमच्या वाणीच हायं फक्त धंदा वेगळा-वेगळा आम्ही मातीत जीव पेरतो आणि ही मिठाई तळताना सगळी मेहनत या गरम तेलात तळून काढतोय आणि तुमच्या घामाची माती होती अवं नीट सांगा की सुरू केलेली टमटम बंद केली हेडलाईट ईजवली वातावरण पण शांत होतं आम्ही म्हणजे मातीचं गुलाम मिठाईचं गुलाम शेती पिकवतो गावोगाव जाऊन दारोदारी ही मिठाईपण विकतो पण मोठा व्यापारी आमच्या मानगुटीवर बसतो आमच्या शेतमालाचा भाव तोच ठरवतो जगायचं लई अवघड झालंय बाबा वसंता वैतागून बोलत होता ड्रायव्हरची अन त्याची एकच परवड बोलण्यात दोघांची रास जुळलेली होती आम्हाला तर असं वाटतंय रस्ता तसं बघितलं तर खाच खळग्याचा रस्त्याचं गरदाड बरं पर पोटाचं गरदाड लई बेकार राव


काय सांगायचं आपल्यापेक्षा रस्त्यावरची आणि फूट पाथ वरची भिकारी बरी राव कसलाच डोक्याला ताप नाही…तसं नाही बाबा यांना कुठे आपल्यासारखी घरदार…शेतीवाडी… हलवायाची दुकानं…जमीन जुमला असतंय होय बरं जाऊ द्या गुटख्याची पचदिशी पिचकारी टाकून ड्रायव्हरनी टमटम चालू केली दोघांच्या पण सुखदुःखाच्या गोष्टी उगाळून झाल्या वसंताने पण तंबाखू ची पिशवी काढली कोपरीतं ठेवलेली चुन्याची डबी काढली बार भरला तोंडात तंबाखू ची गोळी ठेवून त्यो पिशवी खांद्यावर टाकून घराकडे झपाझप पावलं टाकत चालू लागला गावा संग अजून लाईटीचं प्रेम प्रकरण चालू होतं अजून काय लगीन झालं नव्हतं नुसतं तळ्यात-मळ्यात चाललं होतं पुढाऱ्यांनी गावात नुसती लाईटीची खांब रोवल्यावानी केलं होतं त्याला पाच वर्षे झाली रात किड्यांची चिरचिर आणखीनच काळोखाला साथ देत होती अचानक एकांताला छेदत कुत्र्याचा गलका सुरू झाला
त्या अंधाऱ्या रात्रीचे दहा साडे दहा झाले होते तेवढ्यात दोन-तीन आकृत्या समोरून पळत यायला लागल्या तसं पाहायला गेलं तर वसंताच घर एक सात किंवा आठ मिनिटाच्या अंतरावर होतं त्या दोन आकृत्या त्याला पहिल्यांदा भास वाटला काही वेळेला गडी पण असतात आता गडी म्हणजे चोर तर चोरी जर करता आली नाही तर घायकुतीला येऊस्तवर मारत्यात तशात ही घामानी डबडबलं काय करावं कळना कुठं पळावं ही पण सूचना तर ती खरं म्हणजे गडी होते lचोरटे होते यावेळी त्यांनी यरवाळीचं काम दावलेलं होतं त्यानं नीट निरखून पाहिलं हातात त्यांच्या गठुडी होती त्यांना दोन मिनिटांनी पाठमोरं बघितलं पण त्या काळ्याकुट्ट अंधारात त्याला काहीच सुगावा लागला नाही तिकडे ह्याचं व्हाटं कोरडं पडलं होतं जीभ तर कागदांवानी झाली होती तरीपण वसंता मनाशी म्हणाला कोण गब्रू असतील तेवढ्यात खालच्या आळीला चोर चोर गडी गडी असा गलका झाला चोरट्यानां आमुश्या पावली म्हणायची असं म्हणून तो पुन्हा हळूहळू चालायला लागला आता त्याची बायको तिचं नाव सत्यभामा पण आख्खा गाव तिला भामी म्हणायचं आणि इकडं ह्यो घरी येउस्तवर याची बायको वाटं कडं डोळं लावून बसलेली कवा सकाळचा चहा पिऊन त्या मार्केट यार्डात गेलेला होता शेतात काढलेलं माळवं त्या चांदवडच्या आडत्याला दिलेलं होतं बहुतेक त्या माळव्याची आडत्या कडून पट्टी बक्कळ आली असेल या मुडद्यानी याला लुटलं तर नसेल…नाही नाही ती मनात यायचं हे बघा मन चिंती ते वैरी न चिंती अशी मनावर फुंकर मारून विषय सोडायचा प्रयत्न केला पण विचारांचा भुंगा काय मनाला मोकळं बसू देईना आणि तेवढ्यात दारावर टकटक झाली तर हि घाबरली ना…पण एक मन म्हणत होतं आपलं हेच असतील पण त्यांनी हाळी दिली असती अशी जोडणी मनाशी करत तवर दारावर जोराची थाप पडली आता मात्र ती भीतीने तंतरली होती तरीपण डेरिंग करून कोमल आवाजात आतूनच आवाज दिला कोणsss मी आतच होतो सोबत तिची दोन पोरं होती पण ती झोपीच्या कवाच आधीन झालेली होती तशात ही बाहेरनं म्हणतयं आग भामे दार लवकर उघड तिने दुसरी काही ओळख न देता पहिल्यांदा बाहेर आली वसंताचा आवाज ऐकून भामानं दार उघडलं आणि जिवाच्या भीतीने कात्रीतनं जीव सुटला दार उघडलं आणि ती बाहेर आली आणि म्हणती कसं काय झालं येवढं घाबरायला काय वाघ आला का काय खरं तर हीच मुळात घाबरलेली पण मोक्या च्या वेळी धीर यालाच म्हणतात.

भामा पण लाडं लाडं हसायला लागली आता चोरटे आलते म्हणून खालच्या गल्लीला कालवा चालला होता तुम्हाला बरं अडवलं नाही अगं मला आली होती आडवी अन थडकली पण पळाली सुदिक तशी भामा म्हणाली तुम्ही का बरं मुकाट्यानं दारावर टक टक करीत होता काय तोंड बंद आहे का नाही बोलायला भामा जरा ठेंग्यातचं बोलली तसा वसंता बोलला तोबरा होता ना तोंडात तुम्ही काय कुस्ती बिस्ती खेळला का काय कोणा संग वसंता म्हणाला व्हयं आपल्या गावच्या पहिलवाना बरोबरच खेळलो गावात कुठं आहेत पैलवान आपल्या गावचा खड्ड्यांचा रस्ता म्हणजे पैलवान आणि त्याला तोंड देऊन सुखरूप गावात किंवा घरी यायचं म्हटल्यावर असं फुपाट्यानी अंग ही भरणारच दोघांचं काहीतरी वंगाळ बोलणं झालं दोघांनी समजुतीने घेतलं दोघांच्या पापण्या वल्ल्या झाल्या बाहेर रात्र काळी पावलं टाकत सरकत होती बाहेर काळोखाची दादागिरी वाढत होती गाव झोपेच्या गारीत मरुन सून्न पडलं होतं पण या दोघांचं घर अजून जागं होतं त्या या भामीनं तारं मंदी एरंडं ववून मेणबत्ती केलेली त्याच्या मंद प्रकाशात घरात गरीबी नांदत होती तसा वशा वरडला काय केलस ग तू कंदील का नाही लावला आता त्याला घासलेट कुठे आहे आणि मग आज तारीख काय आहे ग तवा आज 15 तारीख आहे असं म्हणताचं रेशनिंग वरचं घासलेट नाही का आणायचं मस लागोपाठ गेल्ती पण तो हरामी दुकानदार कुठं मेळ बसून देतोय व्हयं आलचं नाही आलचं नाही म्हणतोय कालपासून… तसा वशा बोलला धड जगू देईना आणि मरू बी देईना नुसती परवड झाली बघा…त्यात पाण्यासाठी चार विहिरी पालथ्या घालाव्या लागतात दर पवऱ्यात तांब्याभर पाणी येतय लेकीनं कुंभाराच्या आढा वरणं हंडा भरून आणला आहे थोडीशी चूळ भरा आणि जेवायला बसा हात-पाय धुवायच्या फंदात पडू नका च्यायला टँकर मुक्त गाव आता फक्त आपल्या स्वप्नातच यायचा वसंता रागानेच बोलला भामानं त्याला जेवणाचं ताट केलं स्वतःपण वाढून घेतलं दोघं जेवायला लागली त्यांची पोर गुड्डी पप्या शांतपणे गोधडीत झोपी गेली होती पोरांवरून मायेची नजर फिरवत आणि माझ्याकडे बघत वसंतांनी विचारलं पोर आणि ह्यो जेवला का तिनं उत्तर दिलं ही सगळी जेवल्यात जेवता जेवता तिने न राहवून विचारलं की पट्टी किती आली वसंताने रागानं तिच्याकडे न बघता जेवता जेवता खिशातला कागद काढून तिच्याकडे भिरकावला भामानी जेवायला क्षणभर ब्रेक लावला कागद बघितला पार तिचं हातपायचं गळून गेलं बघा एवढचं काय थोडा कांदा… भाजी…भेंडी…पात कोथिंबीर…मळ्यात आहे तवर सोनं अन खळ्यातनं बाजारात आलं की त्याची माती होती आता बघा भाज्या महागल्या तर आपण खुश भाज्या स्वस्त झाल्या तर व्यापारी आणि गिऱ्हाईक खूश…वसंताने वचा वचा भाकरी खाल्ली परातीत हात धुतला परातीतले खरकटं पाणी प्याला खिशातनं तंबाखूचा बटवा आणि चुन्याची डबी काढून तंबाखूचा बार भरला
हे दृश्य मी माझ्या डोळ्याने पाहिले या एकदा वसंत बरोबर मी सुद्धा चांदवडला व्यापाऱ्याकडे आडत्या कडे गेलो होतो एका शेतकऱ्यांनी 34 गोणी बटाटा आणला व्हता त्याचं त्याला साडे अठराशे रुपये मिळालं बघा काय भाव मिळाला असल ही त्याचं त्यालाच माहिती जाण्यायेण्याचा आणि मशागतीचा खर्च तरी निघाला आहे का नाही काय माहीत नाही त्यामुळे ती लोकं काय जादूचा खेळ करतात कोण जाणे थोडी जमीन आपली असती पण आपल्याला त्याचं काही सुद्धा सुख मिळत नाही आता हलवायचं दुकान असल्यामुळे चलती का नाम गाडी म्हणायचं आणि आपला कसं तरी दिवस ढकलायचा येवढच खरयं
…………………………………………………….
किरण बेंद्रे
पुणे
7218439002

litsbros

Comment here