जेऊर माढा सोलापूर जिल्हा

जेऊर व माढा येथे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न; धैर्यशिल मोहिते-पाटील

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जेऊर व माढा येथे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न; धैर्यशिल मोहिते-पाटील

(प्रतिनिधी); / करमाळा तालुक्यातील जेऊर व माढा रेल्वे स्थानकावर सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळविण्यासाठी रेल्वेचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजप नेते धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी पत्र लिहून प्रवासी थांबण्याची मागणी केली आहे.

सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील लोकांना सोयीचे असलेल्या जेऊर व माढा रेल्वे स्टेशनवर नेहमी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते.पुणे येथे दररोज शाळा काॅलेजचे विद्यर्थी, व्यापारी, नोकरदार वर्ग व हाॅस्पीटल्स करीता ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
या रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोईकरता हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा आवश्यक आहे.

हेही वाचा – हजरत मोहम्मद पैगंबर जयंती उत्सव समिती करमाळाच्या अध्यक्षपदी जयकुमार कांबळे तर उपाध्यक्षपदी युसुफ शेख

हाजी हाशमुद्दीन तांबोळी चारिटेबल ट्रस्टचा आगळा वेगळा सामाजिक उपक्रम, गोरगरीब गरजूंना दिवाळी फराळाचे वाटप

सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळाल्यास या शहरातील व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल, तसेच शिक्षण व्यवसायांच्या दृष्टीने या शहरांच्या विकासाला चालना मिळेल.

दळण वळणाच्या दृष्टीने हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा सोयीचा व गरजेचा असून रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाकडे पाठपुरवा करणार असल्याचे धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी सांगितले.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!