संविधान दिनानिमित्त करमाळा शहरात ‘संविधान सन्मान मिनी मॅरेथॉन’चे आयोजन; सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन
करमाळा(प्रतिनिधी);
26 नोव्हेंबर 2023 रोजी करमाळा शहरामध्ये संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान सन्मान दौड अर्थात मिनी मॅरेथॉन हि स्पर्धा संपन्न होणार आहे. सदरील स्पर्धेचे आयोजन जनतेचे नगरसेवक जयकुमार कांबळे, भिमाई बहुउद्देशिय सामाजिक संस्था व डॉ. आंबेडकर संघर्ष समिती करमाळा यांनी केले आहे. सदरील मिनी मॅरेथॉनसाठी करमाळा शहर व तालुक्यातून विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी केलेली आहे. सदरची मिनी मॅरेथॉन 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी ठीक 6.30 वाजता सुरू होणार आहे.
तरी सदरच्या कार्यक्रमाचे उद्घाटन बौद्धाचार्य प्रशांत कांबळे व दलित सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव भोसले यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या मिनी मॅरेथॉनसाठी भीम आर्मी (संरद) महाराष्ट्र कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे, ॲड. सचिन हिरडे, मा. नगरसेविका सविता कांबळे, फारुक बेग, आगार व्यवस्थापक होनराव साहेब, अमीरशेठ तांबोळी, पार्श्वगायक संदीप शिंदे-पाटील, भिमदल सामाजिक संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनिल भोसले, पत्रकार अलिम शेख, पत्रकार अशपाक सय्यद, पत्रकार सिध्दार्थ वाघमारे, पत्रकार विशाल परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य मिनी मॅरेथॉनचा कार्यक्रम उत्साही आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.
तरी सदरची मिनी मॅरेथॉन खुल्या गटात होणार आहे. यासाठी प्रथम तीन मुलांसाठी व प्रथम तीन मुलींसाठी आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हि स्पर्धा मुलांची व मुलींची स्वतंत्रपणे घेण्यात येणार आहे. तर उत्तेजनार्थ मुलींसाठी दहा प्रमाणपत्र व उत्तेजनार्थ मुलांसाठी दहा प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
हेही वाचा – चार फेब्रुवारीला होणार करमाळा येथे श्रीराम प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
** प्राजक्तांच्या फुलातलं म्हातारपण ** // इथं रिटायर लोकांचं मांडलंय… // // हाय ती बरंय म्हणायचं //
तरी सदरच्या संविधान सन्मान मिनी मॅरेथॉन स्पर्धेत सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा. असे आवाहन सनी कांबळे, मंगेश ओहोळ, फिरोज शेख, युसुफ शेख, समीर शेख, सुभाष गोसावी, सागर पवार, शैलेश कांबळे, राजू पवार, गणेश पवार, रवी कांबळे, सिद्धांत कांबळे, संघर्ष कांबळे, राहूल कांबळे, प्रणव जानराव, प्रियांश जानराव, सम्राट सरवदे, सार्थक कांबळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Comment here