करमाळा माणुसकी सोलापूर जिल्हा

जनसेवा हीच ईश्वर सेवा फाउंडेशन केत्तूर मधील सदस्यांनी मिळवून दिला दोन निराधार महिलांना आसरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जनसेवा हीच ईश्वर सेवा फाउंडेशन केत्तूर मधील सदस्यांनी मिळवून दिला दोन निराधार महिलांना आसरा

केत्तूर (अभय माने) गेली कित्येक दिवस एक मध्यमवयीन महिला केतुर गावामध्ये भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती. मानसिक विकाराने त्रस्त या महिलेस कोणीही आप्तेष्ट नव्हते.
ही गोष्ट जनसेवा फाउंडेशनचे कार्यकर्ते रेवन पवार व किरण निंबाळकर यांच्या नजरेत आली व त्यांनी त्यांचे पुनर्वसन करण्याचा विडा उचलला.व त्यास फाउंडेशन मधील सर्व सदस्यांनी मुक्तहस्ते आर्थिक मदत करून पाठिंबा दिला.

     विविध अनाथ स्त्रियांचे संगोपन करणाऱ्या संस्थेला त्यांनी संपर्क साधला. त्यातून निलंगा येथून एका आश्रमाचे संचालक बाजार तळात एकटी राहणाऱ्या या महिलेस नेण्यासाठी आले होते. पण तिने त्यांच्याबरोबर जाण्यास नकार दिला. त्यांना येण्याजाण्याचा खर्च फाउंडेशनला सोसावा लागला.तरीही आशा न सोडता विविध ठिकाणी कार्यकर्ते प्रयत्न करत राहिले. त्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील  माऊली सेवा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा र्डॉ.राजेंद्र धामणे यांचा सतत पाठपुरावा रेवण पवार व डॉ. जिनेंद्र दोभाडा यांनी घेतला व त्यांनी येण्याचे आश्वासन दिले.

      डॉ. प्रकाश आमटे यांच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय एक कोटी रुपयाचा पुरस्कार मिळवलेल्या माऊली सेवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमध्ये डॉ.राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे या पती-पत्नींनी जवळपास 500 महिला व त्यांच्या 50 मुलांचे पुनर्वसन केले आहे. गेली सोळा वर्ष ही जोडी अविरतपणे संस्थेच्या नावाप्रमाणे निराधार माऊलींची सेवा करत आहेत.निराधार महिलांच्या पुनर्वसनासाठी जवळपास दहा एकर क्षेत्रामध्ये या महिलांसाठी गोपालन ,कुक्कुटपालन,शेळीपालन, डेअरी प्रॉडक्ट, बेकरी अशी विविध उपक्रम सुरू केले आहेत.

मनोरुग्ण महिलांच्या उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड, स्वतःचे अद्यावत ICU असणारी महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव संस्था असावी.अशा या माऊली सेवा प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा डॉ. सुचेता धामणे व डॉ.राजेंद्र धामणे दांपत्य केत्तूर नं.2 (ता.करमाळा) येथे निराधार महिलांना नेण्यासाठी स्वतः उपस्थित राहिले. यावेळी दोभाडा हॉस्पिटलमध्ये धामणे दांपत्याचा यथोचित स्वागत व सत्कार डॉ. सारिका व डॉ जिनेंद्र दोभाडा यांच्या हस्ते करण्यात आला.

हेही वाचा – वाशिंबे:पादचारी रेल्वे भूयारी मार्गाच्या कामाला अखेर सुरवात अनेक वर्षांपासूनचा प्रश्न सुटल्यामुळे ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त

पोफळजच्या हळदी-कुंकू समारंभात माता पालकांसह जेष्ठ व विधवा महिलांचाही उत्स्फुर्त सहभाग . मनोरंजनात्मक स्पर्धा : विजेत्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान 

यावेळी रेवण पवार, किरण निंबाळकर,शिवाजी पाठक,अँड.अजित विघ्ने,पत्रकार राजाराम माने,सचिन जरांडे, गोटु खाटमोडे ,उदयसिंह मोरे पाटील संजय कुर्हाडे ,बबन साळवे,रणजीत पाटील,बाबा मोरे व फाउंडेशन मधील सर्व देणगीदार , सेवानिवृत्त जेष्ठमंडळी उपस्थित होते सर्व सदस्यांच्या उपस्थितीत सदर महिलेस व अजून एका निराधार वृद्ध महिलेस संस्थेच्या ताब्यात देण्यात आले. विशेष म्हणजे डॉ.सुचेता धामणे यांनी त्या दोन्ही महिलांसी सुसंवाद साधत त्यांना आपलेसे केले त्यामुळे त्या त्यांच्याबरोबर जाण्यास सहज तयार झाल्या.

व जनसेवा हीच ईश्वरसेवा फाउंडेशन तर्फे एक विधायक कार्य पार पडले.

छायाचित्र-डॉ.राजेंद्र धामणे यांचा सत्कार करताना फाउंडेशन चे कार्यकर्ते 2) निराधार महिलांना ॲम्बुलन्समध्ये घेऊन जाताना

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!