आम्ही साहित्यिकपुणेमहाराष्ट्र

गावगुंडी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

🌹🌹🌹🌹🌹 गावगुंडी 🌹🌹🌹🌹🌹
===============
आता बघा हे नाव नुसतं कानावर जरी पडलं तरी समजून जायचं की त्या गावांमध्ये निवडणुका लागल्यात मग त्या ग्रामपंचायतीच्या… दूध डेअरीच्या…सोसायटीच्या पतसंस्थेच्या….बाजार समितीच्या… हितपर्यंतच्या लेवलच्या ठीक आहे म्हणजे हा वरील शब्द याला लागू पडतो पण आता तालुका पातळी जिल्हा पातळीवरील क्षेत्रात पण ही लागू झाला आहे का तर जिल्हा पातळीवर समजा कोणत्या गावात कोणत्या गटामध्ये किती लीड मिळाला म्हणजे ही एक शस्त्रशुद्ध पद्धतीने अगदी फार्म भरल्यापासून पार निकाल लागूस्तवर ही गावगुंडी म्हणजे राजकारण नावाची ही सिस्टीम अहोरात्र काम करत असते
आता गाव पातळीवर गावगुंडी हा शब्द तंतोतंत लागू पडतो आणि मी तर म्हणन की इतर निवडणुकीचं जाऊ द्या पण हीच निवडणूक जिल्हा बँक किंवा साखर कारखान्याची जर असल तर पैशाची पेरणीच म्हणायची कुणी…किती…आणि कुठे… पैसा घालवला याचा करेक्ट हिशोब लागणं कठीण असतं म्हणजे बघा अंदाज पंचे लाखोच्या किंवा कोटीच्या घरातच बोलायचं आज आपण जरा या विषयावर बघणार आहोत तर गावगुंडी किंवा राजकारण म्हणजे त्याचा मूळ अर्थ आहे अनेक व्यक्तींनी एकत्रित रित्या निर्णय घेण्याची प्रक्रिया अनेक संस्था किंवा देश…व राष्ट्र किंवा प्रांत… म्हणजेच जिल्हा…तालुका…गाव…या पातळीवर सत्ता मिळवण्यासाठी अनेक नेते जे निर्णय घेतात काम करतात त्याला राजकारण म्हणायचं आणि हे निवडणुकी पुरतंच बांधील राहत नाही राजकारणाचा खूप व्यापक अर्थ आहे हेतू खूप उदात्त आणि मोठा आहे दुर्दैवाने आपण त्याच्याकडे तशा व्यापक अर्थाने पाहत नाही आपला प्रांत कसा चालला पाहिजे…कुठल्या तत्त्वावर चालला पाहिजे त्याचे आग्रह काय असले पाहिजेत या साऱ्यांचा विचार मांडणं आणि त्यासाठी आग्रह धरणं आणि ती पूर्ण करण्यासाठी सत्तेत येणं गरजेचं असतं त्यासाठी निवडणुका लढवणे व जिंकणे या जिंकण्यासाठी लोकांना काहीतरी पटवून देणं व नंतर ते सत्यात उतरवून सामाजिक… सांस्कृतिक…भौगोलिक… आर्थिक… घटकांच्या स्वभावाचे विशिष्ट विचार अंगीकारून विशिष्ट समाज समूह…संस्था किंवा भूभाग यावर सत्ता मिळवण्यासाठी व सत्ता तसेच प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी केलेली कृती म्हणजे राजकारण


खरंच राजकारण या क्षेत्रामध्ये घुसलं आणि अत्यंत सूक्ष्म पणे विचार केला तर राजकारण आणि गजकरण ही सारखीच…कारण दोघांना पण खाजवल तेवढी खाज सुटते आणि नखाने खराखरा खाजवल्याशिवाय चैन पडत नाही का तर गावात अशी काही घटक मंडळी काही वेळा आपलीच माणसं अशी विचित्र असतात दोन-चार वर्षांपूर्वीच भांडण वैमनस्य दुश्मनी शांत झालेली असताना त्याला येऊन म्हणायचं उगा आपण तवा दोन पावलं मागं सराकलो आपलं मिटवून घेतलं…नाही तर आपण तरी काय कमी होतो व्हयं हे असं हिकडे येऊन इकडच्याच्या डोक्यात ठासून भरलं ही होतं डोक्यामध्ये शॉट लगेच बाह्या सावरल्या गेलं बळंहून उकांडा उकरायला शिळ्या कढीला ऊत आल्यावाणी आता समोरच्याने काढला वाशाचा तुकडा घातला नडगीवर बसला महिना दोन महिने प्लास्टर करून घरामध्ये असल्या फुटक्या कानाचं होतं काय निर्णय घ्यायचा तो स्वतःच्या मताने घ्यायचा सोबत चार जण हाताशी ठेवायची एकाला तर काय झालं जवळजवळ अर्ध्या गावांनी भरीला घातलं आनंदा आप्पा आपल्याला निवडणूक लढवायची म्हणून खरं मग मनापासून त्याच्या मनात नव्हतं पण ह्याला भरली हवा सात-आठ एकर जिराईत उशाला होती एवढं काय नव्हतं आपलं करायचं तवा खायचं अशी परिस्थिती चांगलं शेती खात्यामध्ये मैलकुलीचा मुकादम म्हणून सरकारी कामात होतं पण नियम असा सांगतो सरकारी नोकरांनी नोकरीशिवाय कुठलाही व्यवसाय करायचा नाही आणि निवडणूक लढवायची नाही कायद्याप्रमाणे यांनी पहिल्यांदा नोकरीचा राजीनामा दिला


आता गावातल्या बाकीच्या राहिलेल्या चमच्यांनी सांगितलं एवढं जेवढं तुम्ही आयुष्यभर कमावणार नाही तेवढं वर्षा दोन वर्षात तुम्ही निवडून आल्यावर कमवताल झालं ही पण थापाल्लं निवडणुकीला उभं राहिलं आता गणित बघा फॉर्म भरायला अर्धा गाव… प्रचाराला अर्धा गाव…पदयात्रेला अर्धा गाव…निवडणुकीत पडलं डिपॉझिट जप्त झालं एकटं घरी आलं आता गावात अपमान झाल्यामुळे चार दोन दिवस काही घराबाहेर पडलचं नाही चार दोन दिवस जाऊन दिले हे पहिले दहा वीस चमचे होते ते सांत्वन करायला आले जाऊ द्या आता आपलं गावच तसं बघायला गेलं तर हलकट पण ही पण त्यात जमा म्हणजे ही पण हलकटच होतं बहुदा आपल्यात हार जीत असतेच आपण तालुका पंचायत समितीला प्रयत्न करू आप्पा म्हणलं इथं ग्रामपंचायतीला मी पडलो दोन एकर घालवले नोकरी सोडली आता काय तालुक्याला मी येत असतोय व्हयं याला म्हणतात गावगुंडी
राजकारण हे फक्त निवडणुकीपुरतं किंवा लढायापर्यंत मर्यादित नाही त्याला विचार असणं व त्या विचारांना मूल्याचा आधार असणं व हेतू असणं हे आवश्यक आहे राजकारणाला काही श्रद्धा व हेतू पण आवश्यक असतात असा विचार प्रत्येक नागरिकांनी किंवा राजकारण्यांनी ठेवणं गरजेचं आहे आपल्याला नक्की काय करायला हवं याची दिशा पक्की असायला हवी निवडणुकीच्या काळामध्ये राजकारणी लोकांचा कस लागतो एक तर वातावरण तापलेलं असतं गाव पुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असते युवा नेत्यासह हौशे…गवशे…नवशे… यांना ऊत आलेला असतो निवडणूक जरी गावकीची असली तरी भावकीची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तर अर्ज भरल्यापासून अख्ख्या गावात निवडणुकीचा रंग भरायला सुरुवात होते गावच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी गट गेल्या दोन महिन्यापासून गावात सक्रिय झालेले असतात जनतेतून सरपंच होणार असल्याने सरपंच पदावर ताबा मिळवण्यासाठी या दोन गटांमध्ये राजकीय संघर्ष पेटत असतो दोन्ही गटाकडून मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी हात मोकळे सोडायचं धोरण हाती घ्यावं लागतं तालुक्यातील नेत्यांना गावच्या राजकारणात आपली मक्तेदारी मजबूत करण्यासाठी सरपंच पदावर आपला कट्टर किंवा निष्ठावंत समर्थक निवडून आणण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागते निवडणूक होणाऱ्या गावात तालुका पातळीवर राजकारण करणारे नेते असल्यामुळे त्यांना आपल्या ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखण्यासाठी मोठे राजकीय डावपेच आखावे लागतात ह्या गाव पातळीवरील राजकारणावर पकड घट्ट करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून मतदारांना आमिष दाखवलं जातं मतदारांना ओल्या पार्ट्या देण्याचे काम दोघाकडून पण होत असतं ढाब्यावर गर्दी वाढल्याचं चित्र दिसून येतं निवडणूक गावची असली तरी तालुक्यातील राजकारणातील आपला धबधबा कायम राखण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्यामुळे कुरगुडीच्या राजकारणाला सुरुवात झालेली असते


अजून एक लक्षात घेण्यासारखं म्हणजे खेडेगाव मध्ये वाड्या वास्त्यावर वाढदिवस साजरा करण्याचं प्रमाण मोठं असतं आणि याचं फ्याड सगळीकडचं वाढलेलं तर या सोशल मीडियामुळे म्हणजे व्हाट्सअप… फेसबुक इत्यादी द्वारे हा वाढदिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो का काय असं वाटतं त्यातून निर्मिती होते एका भावी राजकारणी पिढीची ज्याचा वाढदिवस आहे त्याचा आपल्याच तोऱ्यात चालणारा किंवा हात वर करून भाषण करताना अशा पोज मधील फोटो खाली शुभेच्छुक म्हणून दहा वीस जणांचे पासपोर्ट साईजचे फोटो आणि ह्याचं तसं बघायला गेलं तर गावात काही पण म्हणजे चांगलं पण आणि वाईट पण असं कोणत्याच प्रकारचं कार्य झालेलं नसतं पण त्या चौकात लावलेल्या कट आउट वर परिसराचे भाग्यविधाते… विकासाच्या ध्येयाने पछाडलेले…वार्डातला ढाण्या वाघ…अशी कुठून आणत्यात ही असली विशेषणं ती लावून ती मोठं नसतचं पण त्याला खालच्या दहा वीस जणांनी म्हणजे फोटोतल्यानी त्याला पुढं आणलेलं असतयं ही पण एक राजकारणच बरं का आणि ज्याचा वाढदिवस त्याचं वय समजा दहा वर्षाच्या आसपास असलं तर त्याचं काय गावात कार्य नसतयं पण उमलते नेतृत्व अशी उपाधी लावायची आणि राजकारण खेळायचं झालं तर ते काही एकट्या दुकट्याने खेळता येत नाही त्यासाठी कार्यकर्त्यांचा समूह हमेशा जवळ बाळगावा लागतो त्यांना कार्यकर्त्यांची फळी म्हणतात या फळीतले कार्यकर्ते पहिले निष्ठावान होते कोणत्याही पदाची अपेक्षा न करता काहींनी जवळजवळ आपलं आख्खं आयुष्य पक्ष सेवेमध्ये व पक्ष मोठा करण्यामध्ये घालवलं खरंच त्यांचा सन्मान केला पाहिजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे

हेही वाचा – निंभोरे सोसायटीवर माजी आमदार जगताप गटाचे वर्चस्व; क्लिक करून वाचा विजयी उमेदवार नावे..

सत्तरीच्या दशकातली पोमलवाडी अन केतुर “””””””””””””””””””””””””””” 🌹 ……..( चला पोमलवाडीला )………🌹
आणि आता काही ठिकाणी तर काही एकपात्री राजकारण करणारे एका विचित्र घटकाचे लोक गावांमध्ये असतात चांगलं गावामध्ये परंपरेनुसार चालत आलेली सरपंचाची बिनविरोध होणारी निवडणूक एक जण उठलं आणि बिनविरोध का म्हणून असं त्यांनी आडवं लावल गेलं तालुक्याला काय तरी उलटं पालटं केलं लावली गावामध्ये निवडणूक केला बट्ट्याबोळ चांगल्या कामात आडवा पाय घालणारा एखादा असतोच गेला गावाला दोन महिने निघून ह्या अशी पण काही कार्यकर्ते असतात आणि आता कार्यकर्त्यांची दुसरी एक फळी असते एका कार्यकर्त्यांनी फोन केला माझ्या वार्डातला माणूस आमक्या आमक्या दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे तेवढं बघा तर पुढाऱ्याची महत्त्वाची मीटिंग चालू होती सकाळी बघू मी बिझी आहे असं म्हटलं तर त्यांनी परत फोन केला सांगितलं.अय कुणाला बोलतोयं मी कायं येडा आहे का तुझ्या मागं दोन-चार वर्ष झालं फिरतोय काय जमत नसलं तर दे सोडून ही चाललो सकाळी दुसऱ्या पक्षात तर पहिले निष्ठावान कार्यकर्ते होते आणि आता निसटा निस्टीचे कार्यकर्ते आहेत
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
किरण बेंद्रे
पृथ्वी हाईट्स… पुणे
7218439002

litsbros

Comment here