करमाळा सोलापूर जिल्हा

गटतट बाजूला ठेवून तुम्ही मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी द्या; पोथरे येथील सभेत माजी आमदार पाटील यांची साद!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

गटतट बाजूला ठेवून तुम्ही मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी द्या; पोथरे येथील सभेत माजी आमदार पाटील यांची साद!

करमाळा (प्रतिनिधी अलीम शेख); गट-तट बाजूला ठेऊन तुम्ही मला लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची ताकद द्या, रिटेवाडी उपसा सिंचन योजना सुरू करुन दाखवणार अशी खात्री माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी पोथरे येथील सभेत बोलून दाखवली. जनसंवाद गावभेट दौऱ्यात आज पोथरे या ठिकाणी पाटील यांनी भेट दिली.

यावेळी आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी ईश्वर वाळुंजकर हे होते तर राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष वारे, सभापती अतूल पाटील, बाजार समिती माजी संचालक देवानंद बागल,
नामदेव शिंदे,संतोष वाळुंजकर,अंकुश शिंदे, दादा झिजाडे सर,बापू गोसावी,रेवन झिजाडे, नवनाथ झिजाडे, वामन पठाडे, हनुमंत शिंदे, विलास शिंदे, विलास साळुंखे, पंडित भांड, किसन शिंदे, प्रभाकर शिंदे, पाराजी शिंदे, संतोष ठोंबरे, दत्ता हिरडे, अशोक जाधव, छगन जाधव, शरद शिंदे, दीपक कडू, बाळासाहेब जाधव, धनंजय शिंदे, तात्यासाहेब गोफने, राजेंद्र झिजाडे, रणजित शिंदे, आबा नवनाथ शिंदे, आबा ठोंबरे, विष्णू खटके,रावसाहेब शिंदे, रावसाहेब पाटील, बबन शिंदे आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले की सन २०१४ ते १९ च्या पंचवार्षिक कालावधी मध्ये किती विकासकामे झाली आणि सन २०१९ ते २४ च्या पंचवार्षिक कालावधी मध्ये किती विकासकामे झाली याचा ताळेबंद आता जनता करत आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघात शेतीसाठी वीज व पाण्याची मागणी वाढत चालली आहे.

उजनी धरण उशाला असून आजही जवळपास एक लाख एकर क्षेत्र जिरायत म्हणून पावसावर अवलंबून आहे हि बाब चिंताजनक असुन हरितक्रांती करुन दाखवण्यासाठी मला सत्ता हवी असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.
यावेळी पाटील यांनी पोथरे परिसरातील वाडी वस्तीना भेटी दिल्या.

पोथरे ते पोटेगाव हा रस्ता गेली अनेक वर्षे नादुरुस्त असुन आमची दळणवळणाची गैरसोय होत असल्याची व्यथा नागरिकांनी बोलून दाखवली. माजी आमदार नारायण पाटील यांनी प्रत्यक्ष या रस्त्याची पाहणी करत लोकांची व्यथा आणि वेदना जाणून घेतली. सहा बंघारे मंजूर असून येथे काम होत नाही. करमाळा तालुक्यातील प्रशासनावर कोणाचा वचक उरला नसल्याने अधिकारी उलट उत्तरे देऊन माघारी लावत आहेत.

तसेच ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम विद्यमान लोकप्रतिनिधी करत असून आता न्याय कोणाजवळ मागायचा अशी व्यथा नागरिक यावेळी माजी आमदार पाटील यांच्या समोर व्यक्त करत होते.

हेही वाचा – सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी शासनाच्या असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या बँकांना धडा कोण शिकवणार ? ज्येष्ठ पत्रकार येवले यांचा सवाल !

“स्वच्छता मॉनिटरगिरी” करण्यात खातगाव नं.2 शाळा राज्यात सर्वोत्तम; मुंबईत होणार सत्कार, टॉप फिफ्टी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकमेव शाळा

यावेळी माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी आपण स्वतः जातीने या सर्व समस्यांवर उपाय योजना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सरपंच अंकुश शिंदे यांनी प्रास्ताविक केले तर रावसाहेब शिंदे यांनी सुत्रसंचलन केले. धनाजी शिंदे यांनी आभार मानले.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!