माढा सोलापूर जिल्हा

गरजू नेत्ररुग्णांच्या सेवेसाठीच कर्मयोगी आमदार बबनदादा शिंदे नेत्रालय – डॉ.श्रीधर कुलकर्णी माढा येथील नेत्र शिबिरात 182 जणांची मोफत तपासणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

गरजू नेत्ररुग्णांच्या सेवेसाठीच कर्मयोगी आमदार बबनदादा शिंदे नेत्रालय – डॉ.श्रीधर कुलकर्णी

माढा येथील नेत्र शिबिरात 182 जणांची मोफत तपासणी

माढा /प्रतिनिधी-सध्याचे युग आधुनिक तंत्रज्ञान व मोबाईलचे युग आहे.अनेकांची सातत्याने बदलती जीवनशैली व आहारात फास्ट आणि जंक फूडचा समावेश,व्यायामाची कमतरता असल्याने अनेकांना डोळ्याचे विकार व व्याधी जडत आहेत. ही बाब अतिशय गंभीर व चिंताजनक आहे.यावर उपाययोजना करण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये महागड्या नेत्र शस्त्रक्रिया कराव्या लागतात तेंव्हा ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू नेत्ररुग्णांना आपल्याच भागात अत्याधुनिक व अद्ययावत सुविधा सहजासहजी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानेच कर्मयोगी आमदार बबनदादा शिंदे नेत्रालय कार्यरत असल्याचे प्रतिपादन दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल व भारती विद्यापीठ पुणे येथील सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ.श्रीधर कुलकर्णी यांनी केले आहे.

ते माढा येथे संकल्प फाउंडेशन संचलित, कर्मयोगी आमदार बबनदादा शिंदे नेत्रालयात जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी रविवारी 2 मार्च रोजी बोलत होते.

या मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे व संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक लुणावत यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले.

यावेळी माढेश्वरी बँकेचे व्हा. चेअरमन अशोक लुणावत यांनी सांगितले की,मागील 16 वर्षांपासून माढा शहरात माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या पुढाकारातून नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वीपणे आयोजन केले जाते.या शिबिराच्या माध्यमातून 7 हजारांहून अधिक नेत्र रुग्णांना पुन्हा नव्याने जग पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.या शिबिरात सर्व नेत्र रुग्णांची मोफत तपासणी करून गोळ्या-औषधे मोफत दिली जाणार आहेत. यावेळी 182 जणांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.

यावेळी सोलापूरचे नेत्ररोगतज्ञ डॉ.गणेश इंदूरकर यांनी सांगितले की,आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या युगात अनेकवेळा अपघात होतात तेंव्हा अनेकांची दृष्टी जाते तेंव्हा अशा रुग्णांना नेत्रपटल त्वरित उपलब्ध व्हावे यासाठी गावोगावच्या लोकांनी मरणोत्तर नेत्रदान करून सामाजिक बांधिलकी जोपासावी.प्रत्येक व्यक्तीने डोळ्याची काळजी व दक्षता घ्यावी.प्रत्येकाने संतुलित, सकस व पौष्टिक आहार घ्यावा जेणेकरून डोळ्यांचे आरोग्य चांगले राहील.रुग्णांनी वेळेवर गोळ्या औषधे घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

सूत्रसंचालन विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले.आभार माढेश्वरी बँकेचे संचालक गणेश काशीद यांनी मानले.

हेही वाचा – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेतील यश निश्चितच कौतुकास्पद – सभापती विक्रमसिंह शिंदे अंजनगाव खेलोबा येथे ग्रामस्थांच्या वतीने गुणवंतांचा नागरी सत्कार

सुपरफास्ट एक्सप्रेसच्या धडकेत आरपीएफ जवान ठार;जिंती येथील घट

यावेळी माजी जि प सदस्य झुंजार भांगे,सरपंच अशोक शिंदे,नगरसेवक राजू गोटे, गणेश काशीद,सज्जनराव जाधव,शाखाधिकारी अनिलकुमार अनुभुले,सचिव निलेश कुलकर्णी,उत्तम रणदिवे, धनंजय शहाणे,शिवाजी घाडगे, श्रीकांत मुळे,नाना बागल, अनिकेत चवरे,बाबा मस्के, संतोष पाडूळे,अमोल खरात, औदुंबर चवरे,रवींद्र शेंडगे, संदीप मुळे यांच्यासह रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

फोटो ओळी- माढा येथील कर्मयोगी आमदार बबनदादा शिंदे नेत्रालयात मोफत डोळे तपासणी शिबिराचे उद्घाटन करताना जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, अध्यक्ष अशोक लुणावत,डॉ. श्रीधर कुलकर्णी,डॉ.गणेश इंदूरकर व इतर मान्यवर.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!