करमाळा सोलापूर जिल्हा

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करमाळा आढावा बैठकीत आमदार शिंदे यांनी केल्या ‘या’ सूचना; वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करमाळा आढावा बैठकीत आमदार शिंदे यांनी केल्या ‘या’ सूचना; वाचा सविस्तर

करमाळा(प्रतिनिधी);
करमाळा तालुक्यात पाऊस लांबल्यामुळे दुष्काळजन्य परस्थिती निर्माण झाली आहे.यातूनच संभाव्य चारा टंचाई व पाणी टंचाई लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, शेतकऱ्यांना मदत, तलावातील गाळ काढणे आदींचा आढावा घेण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी तहसील कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली.

या बैठकीत संभाव्य दुष्काळाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन योग्य नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली असून आवश्यक त्या ठिकाणी जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवा, मीही सरकारकडे मदतीसाठी पाठपुरावा करतो, असे आश्वासन त्यांनी दिले.

करमाळा तहसील कार्यालयात गुरुवारी (ता. ३१) झालेल्या बैठकीवेळी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, समाधान घुटुकडे, प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड, कृषी अधिकारी संजय वाकडे, प्रभारी गटविकास अधिकारी राजाराम भोंग, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे, मंडळ अधिकारी संतोष गोसावी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उध्दव माळी, वामनराव बदे, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, अॅड. राहुल सावंत, विवेक येवले आदी उपस्थित होते.

पाऊस लांबल्यामुळे तालुक्यात दुष्काळजन्य परस्थिती निर्माण झाली आहे. या बैठकीत तलावातील गाळा काढण्यासाठी नियोजन करण्यात आले असून त्यासाठी शेतकऱ्यांनाही आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – पाऊस नसल्याने उभी पिके लागली जळू;चिंतातूर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत करमाळा तालुक्यासाठी ‘इतके’ कोटींचा निधी मंजुर; आ.संजयमामा शिंदे यांची माहिती

टँकर सुरु करण्याची वेळ आल्यास पाणी भरण्यासाठी ठिकाणे निश्चीत करा, अशी सूचना त्यांनी यावेळी दिली आहे. याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन कसे करता येईल, यावरही यावेळी चर्चा झाली.

नागरिकांना रोजगार कसा मिळाले त्यासाठी काय कामे केली पाहिजेत, पीएम किसान योजनेसाठी ईकेवायसी करणे आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!