सोलापूर जिल्हा

नगर व सोलापूर जिल्ह्यातील बंधारे अन् मोठे तलाव बेकायदेशीररित्या भरल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

नगर व सोलापूर जिल्ह्यातील बंधारे अन् मोठे तलाव बेकायदेशीररित्या भरल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप

दुष्काळी परिस्थितीमुळे कुकडी प्रकल्पा अंतर्गत धरणात पुरेसा पाणी साठा झाला नसताना व पाणी नियोजनाची कालवा सल्लागार समितीची बैठक झाली नसताना येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात 28 जुलै 2023 पासून खरीप आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनाद्वारे बेकायदेशीर रित्या कुकडी प्रकल्पात समावेश नसलेले नगर व सोलापूर जिल्ह्यातील विसापूर धरण व लहान मोठे तलाव, बंधारे भरले जात आहेत. हे आवर्तन दोन सप्टेंबर 2023 पूर्वी बंद न केल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने आवर्तन बंद केले जाईल. असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे, तालुका अध्यक्ष संजय भुजबळ, प्रमोद खांडगे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.याबाबत शेतकरी संघटनेचे हांडे,भुजबळ,खांडगे म्हणाले शेतकरी संघटनेच्या वतीने कुकडी सिंचन मंडळाचे अध्यक्ष अभियंता यांना निवेदन देण्यात आले होते. कुकडी प्रकल्पा अंतर्गत धरणात पुरेसा साठा झाला नसून दुष्काळी परिस्थिती आहे. यामुळे खरीप हंगामासाठी कुकडी डावा कालव्यात पाणी सोडू नये अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र पाटबंधारे विभागाने 28 जुलै 2023 पासून येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात 1400 क्यूसेक्सने पाणी सोडले आहे.

आज अखेर हे आवर्तन सुरूच आहे. यामुळे येडगाव धरणाने तळ गाठला असून धरणात 30 टक्के (0.597 टीएमसी) पाणी साठा शिल्लक राहिला आहे. कुकडी डावा कालव्याद्वारे जुन्नर व पारनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप खरीप हंगामाचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे खरीप पिके जळुन गेली आहेत. येडगाव धरणातील अतिरिक्त पाणी घोड धरणात सोडणे अपेक्षित असताना तसे न करता कुकडी सिंचनचे अधीक्षक अभियंता यांच्या आदेशानुसार कुकडी पाटबंधारे विभागाने येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात बेकायदेशीर रित्या आवर्तन सोडण्यात आले आहे.

मंजुर प्रकल्प अहवालानुसार कोल्हापूर बंधारे, पाझर तलाव मध्ये पाणी सोडण्याची तरतुद नसल्याचे कारण सांगून कुकडी प्रकल्पातून घोड, मीना व कुकडी नदीवरील 65 कोल्हापूर बंधाऱ्यांत पाणी न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र दुसरीकडे कुकडी प्रकल्पात समाविष्ट नसलेले नगर व सोलापूर जिल्ह्यातील विसापूर धरण व लहान मोठे तलाव, बंधारे भरले जात आहेत. हा जुन्नर,आंबेगाव तालुक्यातील धरणग्रस्तांवर अन्याय केला जात आहे.याप्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

अतुल बेनके(आमदार जुन्नर ): कालवा सल्लागार समितीची बैठक न घेताच कुकडी डावा कालव्यात खरीप आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनाद्वारे कुकडी प्रकल्पात समाविष्ट नसलेले नगर व सोलापूर जिल्ह्यातील लहान मोठे तलाव, बंधारे बेकायदेशीररित्या भरले असल्याचे पुरावे प्राप्त झाले आहेत. याबाबतचा जाब कुकडी सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता यांना विचारण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबतचा मुद्दा उपस्थित केला जाईल.

litsbros

Comment here