दसरा व दिवाळीसणा निमित “मागेल त्याला ५की दाळ” योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चिवटे
करमाळा प्रतिनिधी –दसरा व दिवाळीसणा निमित “मागेल त्याला ५ की दाळ” योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर डीपीडीसी सदस्य गणेश चिवटे यांनी केले आहे.
याबाबत अधिक बोलताना चिवटे म्हणाले की,
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून दसरा व दिवाळीनिमित्त “मागेल त्याला दाळ” योजनेतंर्गत राज्यातील प्रत्येक व्यक्तीला ६०/- रुपये प्रति किलो दराने प्रत्येकी पाच किलो हरभरा दाळ मिळणार आहे.
सर्वसामान्यांना ही दाळ स्वस्त दरात मिळावी म्हणून नाफेडच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्डच्या ओळख पत्रावर प्रति व्यक्ती ५ किलो दाळ उपलब्ध करून दिली जाणार आहे.
ही दाळ भाजपाच्या सर्व कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.दाळ खरेदीसाठी आधार कार्ड सक्तीचे असून एका कुटुंबात पाच सदस्य असतील तर प्रति व्यक्ती ५ किलो दाळ खरेदी करता येणार आहे.
सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेऊन सोलापुरात पोलीस निरीक्षकाची आत्महत्या
करमाळा तालुक्यातील भाजपच्या वतीने कार्यकर्त्यांना “मागेल तेथे डाळ” विक्री केंद्र प्रत्येक गाव वाडी वस्ती वार्डमध्ये सुरू करून देण्यात येणार आहे. जेणे करून नागरिकांना याचा लाभ घेता येईल.तरी जनतेनी भाजपा कार्यालय करमाळा तसेच भाजपा कार्यकर्ते यांचेकडे संपर्क करावा असे आवाहन गणेश चिवटे यांनी केले आहे.
Comment here