करमाळाजेऊर

खुशखबर- आता ‘या’ नव्या रेल्वे गाडीला जेऊर स्थानकावर थांबा; पुणे जेऊर ये-जा करणाऱ्या प्रवाशांची झाली सोय! क्लिक करुन वाचा गाडीचे वेळापत्रक

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

खुशखबर- आता ‘या’ नव्या रेल्वे गाडीला जेऊर स्थानकावर थांबा; पुणे जेऊर ये-जा करणाऱ्या प्रवाशांची झाली सोय! क्लिक करुन वाचा गाडीचे वेळापत्रक

जेऊर(प्रतिनिधी); मध्य रेल्वे ने पुणे – हरंगुळ(लातूर) – पुणे दरम्यान दररोज एक स्पेशल गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

 यामध्ये जेऊर रेल्वे स्थानकाला थांबा मिळाला आहे. यामुळे करमाळा तालुक्यातील प्रवाशांची सोय होणार आहे. ही गाडी 10 आॕक्टोंबर ते 31 डिसेंबर पर्यंत धावणार आहे. ही गाडी पहिल्या दिवशी जेऊर स्थानकावर आली असता प्रवासी संघटनेकडून गाडीचे छान प्रकारे स्वागत करण्यात आले.

 गाडीला हार घालण्यात आला व इंजिन ड्रायव्हर व गार्ड यांचा गुलाबाचे फूल,पुष्पगुच्छ, हार घालून व त्यांना पेढे भरवून त्यांचा सन्मान करण्यात आला, या वेळी नवीन गाडी चालू झाल्यामुळे व ह्या गाडीला जेऊर स्थानकावर थांबा दिल्यामुळे करमाळा तालुक्यातील जनतेमध्ये तसेच सर्व प्रवाशांमध्ये, नागरिकांनमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले.

 गाडीचे स्वागत करतेवेळी संघटनेचे सुहास सुर्यवंशी(अध्यक्ष) प्रवीण करे(उपाध्यक्ष) सुनील अवसरे,भूषण लुंकड,दिनेश खटके,प्रदीप पवार, बाळासाहेब गरड, हनुमंत कांडेकर, प्रमोद जानकर,अक्षय किरवे, अल्लाउद्दीन मुलानी,राजकुमार राठोड, दादासाहेब थोरात, सुनील कुमार दोशी,अतुल घाडगे,नदाफ,कयूम शेख, तुषार चव्हाण,दादा गरड, दिपक पांडेकर, संदीपान माने,नितीन पवार मेजर ई. उपस्थित होते.

ही गाडी पुणे – हरंगुळ(लातूर) – पुणे अशी दररोज असणार आहे, 

या गाडीचे थांबे व वेळ पुढील प्रमाणे असणार आहेत,

गाडी क्रमांक 01487 पुणे ते हरंगुळ-

1) पुणे- सकाळी 6.10

2) हडपसर- सकाळी 6.20

3) उरूळी कांचन- सकाळी 6.40

4) केडगावं- सकाळी 7.00

5) दौंड- सकाळी 7.30

6) जेऊर- सकाळी 8.30

7) केम- सकाळी 8.45

8) कुर्डूवाडी- सकाळी 9.15

9) बार्शी- सकाळी 9.55

10) उस्मानाबाद (धाराशिव)- सकाळी 10.40

11) हरंगुळ- दुपारी 12.50 (लातूर)

गाडी क्रमांक 01488 हरंगुळ ते पुणे-

1) हरंगुळ- दुपारी 3.00 (लातूर)

2) उस्मानाबाद (धाराशिव)- दुपारी 3.50

3) बार्शी- दुपारी 4.30

4) कुर्डूवाडी- संध्याकाळी 5.30

5) केम- संध्याकाळी 5.53

6) जेऊर- संध्याकाळी 6.20

7) दौंड- रात्री 7.15

8) केडगावं- रात्री 7.35

9) उरूळी कांचन- रात्री 8.00

10) हडपसर- रात्री 8.20

11) पुणे- रात्री 9.00

पुणे – हरंगुळ(लातूर)- पुणे ही गाडी दररोज असून ती जेऊर स्थानकावर ठीक सकाळी 8.30 मी. असते त्या गाडीने आपण केम,कुर्डुवाडी, बार्शी, उस्मानाबाद, व हरंगुळ येथे जाऊ शकता, ही गाडी स्पेशल चालू केली असून भविष्यात ही कायम होण्यासाठी प्रवास्यानी जास्तीत जास्त रिझर्वेशन करून प्रवास करावा. तसेच ज्या प्रवाश्यांना कोल्हापूर च्या दिशेने प्रवास करायचा आहे त्यांनी या गाडीने कुर्डूवाडी येथे साधारण सकाळी 9.00 वाजेपर्यंत गाडी पोहचल्यानंतर उतरावे, उतरल्या नंतर प्रवाशांच्या सोयीसाठी पुढील गाडी कोल्हापूर भागाकडे जाण्यासाठी खूप सोयीची आहे, कुर्डूवाडी येथून सकाळी 9.वाजून 30 मिनिटांनी कलबुर्गी – कोल्हापूर सुपरफास्ट गाडी दररोज असते त्या गाडीत बसून आपण पंढरपूर, मिरज, जयसिंगपूर, हातकणंगले, कोल्हापूर. या ठिकाणी जाऊ शकता. 

 सुहास सूर्यवंशी ( अध्यक्ष प्रवासी संघटना जेऊर.)

litsbros

Comment here