क्रीडामाढाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

श्री नंदिकेश्वर विद्यालयाचे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत यश;पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी देण्यात आल्या शुभेच्छा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री नंदिकेश्वर विद्यालयाचे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत यश;पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी देण्यात आल्या शुभेच्छा

माढा प्रतिनिधी
सोलापूर जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक विद्यालयाने उज्वल यश संपादन केले.विद्यालयाच्या पाच खेळाडूंची पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

यामध्ये अक्कलकोट येथे झालेल्या 14 वर्षे वयोगटाच्या मुलींच्या स्पर्धेत राजनंदिनी वागज हिने 100 मीटर धावणे व 200 मीटर धावणे या दोन्ही क्रीडा स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केले.तिची 100 मीटर धावणे व 200 मीटर धावणे या दोन्ही क्रीडा प्रकारात पुणे येथे होणाऱ्या विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. तर साक्षी काळे हिने 200 मीटर धावणे स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवत यश संपादन केले.तिची पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.तसेच 600 मीटर धावणे स्पर्धेत स्वप्नाली देशमुख हीने सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले.तिची पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.तर 400 मीटर धावणे स्पर्धेत ऐश्वर्या शिंदे हीने तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले.

सोरेगाव,सोलापुर येथे झालेल्या 17 वर्षे मुलांच्या धावणे स्पर्धेत प्रसाद डुचाळ यांने 400 मीटर धावणे स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले. त्याची पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.17 वर्षे मुलींच्या धावणे स्पर्धेत काजल पवार हीने 400 मीटर धावणे स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले.तिची पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.200 मीटर धावणे स्पर्धेत धनश्री खडके हीने तृतीय क्रमांक मिळविला.तर 400 मीटर धावणे व 800 मीटर धावणे स्पर्धेत साक्षी राऊत हीने तृतीय क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केले.विद्यालयाचा 17 वर्षे मुलांचा संघ सोलापूर जिल्ह्यात द्वितीय आला. यामध्ये प्रसाद डुचाळ,शिवराज इंगळे, यशराज देशमुख,संजोतराजे कोळेकर व गणेश देशमुख यांनी उज्वल यश संपादन केले. तर विद्यालयाचा 17 वर्षे मुलींचा संघ सोलापूर जिल्ह्यात द्वितीय आला.यामध्ये साक्षी राऊत,वैष्णवी डुचाळ,काजल पवार,अपूर्वा शेटे व अनुष्का गुंड यांनी उज्वल यश संपादन केले.


यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक शब्बीर तांबोळी सर यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक क्रीडाशिक्षक यांचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार साहेब, क्रीडा अधिकारी गणेश पवार साहेब,विद्यालयाचे मुख्याध्यापक दशरथ देशमुख,स्कूल कमिटी सिताराम गायकवाड, कृष्णा घाडगे

हेही वाचा – राज्यस्तरीय हँडबॉल पंच परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल गरड यांचा जेऊर ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करमाळा

देवडीचे डॉ.ओंकार थोरात यांची पशुधन विकास अधिकारी वर्ग-1 पदी निवड

,ॲड. नानासाहेब शेंडे, अजितसिंह देशमुख साहेब,सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी लोंढे सर व रामचंद्र माळी सर यांच्यासह विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व उपळाई पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

litsbros

Comment here