करमाळा शेती - व्यापार

भिगवणच्या मासळी बाजारात चवदार चित्तल मासा दाखल; दहा किलो वजनाच्या माश्याला मिळाला ‘इतका’ दर!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भिगवणच्या मासळी बाजारात चवदार चित्तल मासा दाखल; दहा किलो वजनाच्या माश्याला मिळाला ‘इतका’ दर!

केत्तूर (अभय माने) बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळसह भारताच्या ब्रह्मपुत्रा, महानदी, गंगा व इंडस नद्यांच्या खोऱ्यात आढळणारा व चवीला अतिशय स्वादिष्ट असलेला चित्तल मासा भिगवण (या. इंदापूर) येथील मासेबाजारात भलताच भाव खावून गेला.अधिक पसंती असलेला व माश्यांमध्ये अधिकाधिक प्रथिने असलेल्यने या माश्याला मत्सयाहारी खवय्ये पसंती देतात. महाराष्ट्रातील नद्यांमध्ये दुर्मिळाने आढळणारा हा मासा तीन-चार दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड एका तलावात सापडलेला आहे.भोसले नावाच्या मच्छिमाराला एक तळ्यात सापडलेला हा मासा भिगवण येथील भगवान महाडिक यांच्या बापूसाहेब फिश मार्केटवर विक्रीला आला होता.

लिलाव बोलीत नवनाथ बंडगर यांनी अधिक बोली लावत खरेदी केला. पावणे दहा किलो वजनाच्या या माशाला भिगवणच्या प्रसिद्ध मासळी बाजारात प्रति किलो 520 रुपये दर आल्याने या एका माश्याची 5070 रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला आहे.

चिताला (Chitala chitala) असे शास्त्रीय नाव असलेल्या या माश्याला इंडियन नाईफ फिश (Indian knife fish) या नावानेही ओळखतात. या माश्याचा रंग चकाकणारे रूपेरी असून पाठीवर ठराविक अंतरावर सफेद आडवे पट्टे असतात. हे पट्टे शेपटीच्या टोकापर्यंत असतात.

सुमारे तीन फूट लांबी व अडीच फूट रूंदी आकाराच्या या माशाचे प्रमुख खाद्य झिंगा,पाण्यातील कीटक व इतर लहान मासे हे आहे. हा मासा आकाराने मोठा होत असला दिसण्यास हा गावरान माश्यातील चालट जातीच्या माश्याप्रमाणे आहे.जगातील अनेक देशात या माश्याला मोठी मागणी आहे.


वाचा वाचा – डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची करमाळा तालुका कार्यकारिणी जाहीर

करमाळ्यातील बागल शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी सतीश कांबळे, विकास काळे व्हाईस चेअरमन

भगवान विष्णूचा मत्स्य अवतार:

भगवान विष्णूचा अनेक अवतारांपैकी मत्स अवतार एक आहे. दानवांचे संहार करण्यासाठी विष्णुने या माशयाचा अवतार घेतल्याची पुराण कथेत ऐकायला मिळते.

” राज्यात नावाजलेल्या भिगवणच्या मासळी बाजारात नव्या जातीचे मासे नेहमी विक्रीला येतात.राज्यातील विविध ठिकण्याहून मत्स्य व्यापाऱ्यांना या नवनवीन माशांबद्दल उत्सुकता असते.भिगवण ता. दंदापूर) येथील मासेबाजारात चित्तल मासा विक्रीला आल्याचे समजल्यावर मत्स्याहारी खवय्यांना पर्वणी ठरली आहे.
डॉ.अरविंद कुंभार,प्राणिशास्त्र अभ्यासक

छायाचित्र -. भिगवणच्या मासळी बाजारात विक्रीसाठी आलेला चित्तल मासा दाखवताना भगवान महाडीक व इतर.

2) चित्तल दाखल

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!