करमाळासोलापूर जिल्हा

भाजप तालुकाध्यक्ष म्हणतात, “रेल्वे गाड्यांना माढा, जेऊर व केमला थांबा, खासदार साहेबांमुळे!”

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भाजप तालुकाध्यक्ष म्हणतात, “रेल्वे गाड्यांना माढा, जेऊर व केमला थांबा, खासदार साहेबांमुळे!”

करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वेच्या माढा, जेऊर व केम या रेल्वेस्थानकावर आणखी तीन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला आहे. यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून हे थांबे मिळाले आहेत, अशी माहिती भाजपचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी पत्रकारांना दिली आहे.

करमाळा तालुक्यातील केम व जेऊर येथे एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी प्रवाशांची अनेक दिवसांपासून होती. या मागणीसाठी प्रवाशांचे आंदोलनेही झाली होती. याची गांभीर्याने दखल घेऊन खासदार निंबाळकर यांनी पाठपुरावा केला होता. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे हा पाठपुरावा केल्याने या रेल्वे एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळाला आहे. याशिवाय माढा रेल्वे स्थानकावर एका एक्सप्रेस गाडीला थांबा मिळाला आहे.

हेही वाचा – सोलापूर-दौंड-सोलापूर या नवीन गाडीचे पारेवाडी येथे जंगी स्वागत; कुठल्या स्थानकावर किती वाजता असेल गाडी? वाचा क्लिक करून

दुर्दैवी घटना! सांडपाण्याच्या चेंबरमध्ये गुदमरुन चौघांचा मृत्यू, तिघे एकाच घरातील; गावावर शोककळा

जेऊर रेल्वे स्थानकावर कोणार्क एक्सप्रेस या गाडीला तर केम रेल्वे स्थानकावर कन्याकुमारी एक्सप्रेस या रेल्वे गाडीला थांबा मिळाला आहे. माढा या रेल्वे स्थानकावर दादर सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस या गाडीला थांबा मिळाला आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष चिवटे यांनी दिली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांची दिल्ली येथे काही कामे असतील तर नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहनही चिवटे यांनी केले आहे.

litsbros

Comment here