भाजपा करमाळा विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांचे संमेलन संपन्न
करमाळा:- भारतीय जनता पार्टी करमाळा विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांचे बूथ संमेलन आज माढा लोकसभा संयोजक राजकुमार नाना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुप्रसाद मंगल कार्यालय येथे पार पडले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने प्रत्येक योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवली आहे.आज प्रत्येक घरात प्रत्येक माणूस सरकारी योजनांचा लाभधारक आहे. याआधी सरकारी योजनांचे लाभधारक शोधावे लागत होते , आता लाभ न मिळालेले लोक शोधून सापडत नाहीत हेच आपल्या सरकारचे यश आहे .माढा लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षाने पुनःश्च उमेदवारी जाहीर केली आहे.
गत निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. या निवडणुकीत आपले मताधिक्य आणखी वाढणार आहे. आज करमाळा तालुक्यातील आजी -माजी आमदार लोकप्रतिनिधी भाजपमध्ये सक्रिय आहेत,
याशिवाय माण,फलटण, सांगोला,माळशिरस,माढा या भागातूनही भाजपला मोठं मताधिक्य मिळणार आहे त्यामुळे यावेळीही रणजितसिंह नाईक निंबाळकर हे राज्यात विक्रमी मतांनी निवडून येणार आहेत.
त्यामुळे उपस्थित बूथ प्रमुखांनी सर्वांना सोबत घेऊन काम करावे असे आवाहन शेवटी पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, सरचिटणीस गणेश चिवटे, सचिन शिंदे, दिग्विजय बागल, शंभूराजे जगताप, जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव , तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे , शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल , किरण बोकन,
विधानसभा प्रभारी काकासाहेब सरडे, सहप्रभारी डॉ.अभिजीत मुरूमकर , दिपक चव्हाण, संयोजक सोमनाथ घाडगे, श्याम शिंदी ,नरेंद्र ठाकूर ,लक्ष्मण केकान ,अमोल पवार, नितीन झिंजाडे,
पत्रकार दिनेश मडके,
लक्ष्मण शेंडगे, बिभिषण गव्हाणे, आजिनाथ सुरवसे, सोमनाथ जाधव, दादासाहेब सरडे, सयाजी जाधव, दादा गाडे ,विष्णू रणदिवे, हरिभाऊ झिंजाडे, प्रवीण बिनवडे, धनंजय ताकमोगे, विकास काळसाईत ,गणेश तळेकर, सागर नागटिळक, धर्मराज नाळे, दादासाहेब देवकर, मच्छिंद्र हाके, हनुमंत रंणदिवे ,भैय्याराज गोसावी, हर्षद गाडे व भारतीय जनता पार्टीचे सुपर वॉरियर्स, बुथ प्रमुख व पदाधिकारी आदी उपस्थित होते,
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवानगिरी गोसावी यांनी केले तर आभार तालुका उपाध्यक्ष उमेश मगर यांनी मानले.