करमाळा तालुक्यातील ‘या’ दोन रस्त्यांसाठी 270 कोटी
81 लाख रूपये निधी मजूर;
आ. संजयमामा शिंदे
केम (प्रतिनिधी)-
करमाळा तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या 71.5 किलोमीटर लांबीच्या 2 रस्त्यांसाठी हायब्रीड अन्युटी (हॅम ) अंतर्गत तब्बल 270 कोटी 81 लक्ष 88 हजार 868 निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये हॅम अंतर्गत 71.5 किलोमीटर लांबीचे 2 रस्ते विकसित करण्यासाठी आपण सुचविले होते .त्यातील केतुर नं2 – केतुर नं.1 – वाशिंबे सोगाव – राजुरी – सावडी ते जिल्हा हद्द हा 8.50 किमी चा रस्ता तसेच सावडी, राजुरी ,पोंधवडी ,विहाळ, अंजनडोह, झरे, कुंभेज, कोंढेज ,निंभोरे ,मलवडी, केम, उपळवटे, दहिवली, कन्हेरगाव ते वेणेगाव हा 63 कि.मी लांबीचा रस्ता अशा एकूण 2 रस्त्यासाठी 270 कोटी 81 लक्ष निधी मंजूर झाला असून याचा फायदा करमाळा तालुक्यातील 11 व माढा तालुक्यातील 4 अशा एकूण 15 गावांसाठी हा रस्ता उपयुक्त ठरणार आहे.

या रस्त्यासाठी प्रति किमी जवळपास 4 कोटी निधी मंजूर झाला असून संपूर्ण रस्ता रुंदीकरणासह मजबुतीकरण केले जाणार आहे. सदर रस्त्याची निविदा काल दि. 11 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाली असून Tender ID – 2024_MSIDC_1031543_24 हा आहे .एप्रिल अखेर पर्यंत सदर कामाची निविदा खुली केली जाईल. सदर कामामुळे करमाळा तालुक्यातील दुर्लक्षित असलेली गावे एकमेकांना जोडली जातील. त्याचबरोबर ती राष्ट्रीय महामार्गालाही जोडली जाणार आहेत. अ.नगर जिल्हा ते सोलापूर जिल्हा असा हा 2 जिल्ह्यातील गावांना जोडणारा अतिशय जवळचा मार्ग यामुळे तयार होणार आहे.

निंभोरे ते कोंढेज या निवृत्तीनाथाच्या परतीच्या मार्गाची दूरवस्था झाली होती या मुळे वारकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता निंभोरे ग्रामस्थानी वारंवार मागणी करूनहि दुर्लक्ष झाले होते पंरूतु आमदार संजयमामा शिंदे यांनी प्रयत्नाला यश आले आहे यामुळे या मार्गावरील गावे हायवेला जोडणार आहे त या मुळे गावचा विकास होण्यास मदत होणार आहे
या साठी कैम येथे रेल्वे उड्डाण पुल होणे गरजेचे मोठ्या गाड्या केम येथील रेल्वे पुलाखाली बसत नाहितसरपंच
रविंद्र वाळेकर. ,,(निंभोरे)





































