माढा राजकारण सोलापूर जिल्हा

बबनदादांनी मंजूर केलेल्या विकासकामांचे फुकटचे श्रेय विरोधकांनी घेऊ नये – शंभूराजे मोरे उपळाई खुर्दच्या सब स्टेशनमध्ये नवीन 5 एम.व्ही.ट्रान्सफार्मरचे उद्घाटन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

बबनदादांनी मंजूर केलेल्या विकासकामांचे फुकटचे श्रेय विरोधकांनी घेऊ नये – शंभूराजे मोरे

उपळाई खुर्दच्या सब स्टेशनमध्ये नवीन 5 एम.व्ही.ट्रान्सफार्मरचे उद्घाटन

माढा /प्रतिनिधी-विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन आमदार बबनराव शिंदे यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून माढा विधानसभा मतदारसंघात गरजेनुसार 12 ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मरला मंजुरी घेतली होती त्यानंतर सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन सर्व नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होण्याची कामे आता पूर्ण होत आहेत त्यामुळे बबनदादांनी मंजूर केलेल्या कामांचे फुकटचे श्रेय विरोधकांनी घेऊ नये असा टोला जिल्हा दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला आहे.

ते उपळाई खुर्द ता.माढा येथील 33 के.व्ही. सबस्टेशनमध्ये माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या प्रयत्नातून मंजूर नवीन 5 एम. व्ही. ट्रान्सफार्मरचे उद्घाटन करताना शुक्रवारी सायंकाळी 25 एप्रिल रोजी बोलत होते.

या नवीन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रास्ताविक ॲड.सुरेश पाटील यांनी केले.

यावेळी विक्रमसिंह शिंदे यांनी सांगितले की, माजी आमदार बबनराव शिंदे यांनी सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून विकासकामे केलेली आहेत.हे नवीन सबस्टेशन सुरू झाल्यामुळे उपळाई खुर्द,अंजनगाव खेलोबा,विठ्ठलवाडी,लोंढेवाडी,खैरेवाडी व गोरेवाडी येथील वीजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.भविष्यात या भागातील जनतेचे प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता शिवम कांबळे व त्यांच्या स्टाफने उपळाई खुर्द ते 30 के.व्ही. सबस्टेशन मधील पेंडिंग व अर्धवट कामे निर्धारित वेळेत पूर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सरपंच संदीप पाटील,उपकार्यकारी अभियंता उद्धव जाधव,सहाय्यक अभियंता शिवम कांबळे,दिपक पाटील,प्रदीप चौगुले, सरपंच संतोष लोंढे,बाळासाहेब इंगळे,सुरेश पाटील,विनायक चौगुले,महादेव गडेकर,नाना वाघमोडे,मदन आलदर,चंद्रकांत व्होनमाने,शिवाजी गोरे,चंद्रकांत मासाळ,राजेंद्र गुंड,कैलास सस्ते,अक्षय सलगर,अमोल आयवळे,उमेश भाकरे,पांडुरंग बोबडे,जनार्दन कदम,हनुमंत मोहिते,सत्यवान कदम, बाळासाहेब कदम,राजाभाऊ शिंगाडे,बाळू बोराडे,रवींद्र शिंगाडे,शिवाजी कदम,महादेव पाटील,कुबेरदास कदम,संतोष कदम,रवींद्र पाटील,रमेश पाटील,विलास बोराडे,हसन तांबोळी,अनिल वाघमोडे, संभाजी पाटील,विक्रम पाटील,शुभम पाटील,दिलीप पाटील,अरुण माने,सुधीर मोहिते,दिगंबर गडदे,सुधीर अनभुले,प्रशांत कदम,बाबा शिंदे, पंकज गडदे,संदीप कदम,राजू कदम यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा – ‘करमाळयातील सुपुत्राच्या पुस्तकाचे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळगावी झाले प्रकाशन : कॅबिनेट मंत्री उदय सामंत राज्यमंत्री योगेश कदम यांची होती उपस्थिती!

उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयाचे एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश एन एम एम एस व सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना मिळणार 12,48,000 रू शिष्यवृत्ती

“शनिवारी होणारे रास्ता रोको आंदोलन स्थगित” – उपळाई खुर्द येथील 33 के.व्ही.सबस्टेशनमधून होणारा वीजपुरवठा कमी दाबाने व सतत खंडित होत होता त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत होते त्यामुळे आम्ही माढा महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनाद्वारे शनिवारी 26 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता स स्टेशन समोरील माढा ते मोहोळ रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता परंतु महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बहुतांश कामे वेळेत पूर्ण करून आमच्या मागण्या मान्य केल्यामुळे शनिवारी सकाळी होणारे रास्ता रोको आंदोलन आम्ही स्थगित करीत असल्याचे सरपंच संदीप पाटील,सरपंच संतोष लोंढे,सरपंच प्रतिनिधी प्रदिप चौगुले व बाळासाहेब इंगळे यांनी सांगितले आहे.

फोटो ओळी- उपळाई खुर्द ता.माढा येथील नवीन 5 एम.व्ही ट्रान्सफार्मरचे उद्घाटन करताना सभापती विक्रमसिंह शिंदे,संचालक शंभूराजे मोरे,सरपंच संदीप पाटील व इतर मान्यवर.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!