मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात महिला आणि लहान मुलांसह 7 ते 8 मजूर जखमी झाले आहेत. या सगळ्या जखमींना उपचारासाठी तातडीने रुंग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात रविवार दि. 27 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर घडला आहे. हा ट्रॅक्टर मजुरांना घेऊन चौफुला बाजूकडून यवतच्या दिशेने जाताना हा अपघात झाला. यादरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात महिला लहान मुलांसह इतर 7 ते 8 मजूर गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत.
या विचित्र अपघातात ट्रॅक्टरमधील हे मजूर रस्त्यावर विचित्र अवस्थेत पडलेले होते. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव तातडीने बचावकार्याला सुरुवात केली. या अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्यांपैकी दोन ते तीन मजूर गंभीर मार लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत.
Add Comment