माढा राजकारण सोलापूर जिल्हा

आमदार बबनदादा शिंदे यांना राज्य मंत्रीमंडळ विस्तारात स्थान द्यावे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आमदार बबनदादा शिंदे यांना राज्य मंत्रीमंडळ विस्तारात स्थान द्यावे

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची मागणी

माढा / प्रतिनिधी – माढा विधानसभा मतदारसंघाचे मागील सहा टर्मपासून प्रतिनिधित्व करत असलेले लोकप्रिय आमदार बबनदादा शिंदे यांना राज्य मंत्रिमंडळात विस्तारात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान देऊन सेवेची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी माढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे शुक्रवारी 7 जुलै 2023 रोजी केली आहे.

यावेळी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन वामनभाऊ उबाळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील,माजी कृषी सभापती संजय पाटील-भिमानगरकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा मतदारसंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले.या निवेदनात म्हटले आहे की,आमदार बबनदादा शिंदे यांनी सरपंच पदापासून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली, पुढे पंचायत समिती सभापती,जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा दूध संघाचे चेअरमन व 1995 ला अपक्ष तर 1999 पासून आज पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग पाच वेळा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्यरत आहेत.

सोलापूर जिल्ह्यात व तालुक्यात झालेली हरितक्रांती,धवलक्रांती, कृषी व औद्योगिक क्रांती,वीज केंद्रे, बोगदा व उपसासिंचन योजना,रस्ते,शैक्षणिक व आरोग्य सुविधा आदी सर्व बाबी आपल्याच सहकार्याने कार्यान्वित करून मतदारसंघातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावले आहे.या सर्व बाबींचा विचार करून आपण आ.बबनदादा शिंदे यांना राज्य मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपद द्यावे असे आग्रही मत सर्व कार्यकर्त्यांनी केले आहे.

हेही वाचा – कोरोनात छत्र हरपलेल्या बालकांना जगदीशब्द फाऊंडेशनचा आधार; सलग तिसऱ्या वर्षी केले शैक्षणिक साहित्याचे वाटप

आ.बबनराव शिंदे यांचेकडून वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 1 लाखाची मदत मानेगाव येथील संस्कृती मोटे व दिपक गावडे यांना दिले प्रत्येकी 50 हजार

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास तोडकरी,जिल्हा दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शब्बीर जहागीरदार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी पाटील,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.निशिगंधा कोल्हे, जिल्हा दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटील-चांदजकर, जि.प.सदस्या रोहिणी मोरे,शुभांगी उबाळे,रोहिणी ढवळे,झुंजार भांगे, उपसभापती धनाजी जवळगे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम ढवळे,दिपक पाटील,विक्रम उरमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो ओळी – मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करताना माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!