करमाळाराजकारणशेती - व्यापार

इंदापूरला पाणी देण्याच्या निर्णयाची गावागावात करणार होळी, यासह आजच्या जेऊर येथील बैठकीत ठरले आंदोलनाचे ‘हे’ तीन टप्पे

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

इंदापूरला पाणी देण्याच्या निर्णयाची गावागावात करणार होळी, यासह आजच्या जेऊर येथील बैठकीत ठरले आंदोलनाचे ‘हे’ तीन टप्पे

करमाळा दि .17 – उजनी जलाशयातून पाणी उचलून इंदापूर तालुक्यातील गावांना देण्याच्या शासन निर्णयाची होळी दि 22 मे रोजी सकाळी करमाळा तालुक्यातील गावा गावात करण्याचा निर्णय उजनीधरणग्रस्त संघर्ष समिती च्या जेऊर येथील बैठकीत घेण्यात आल्याची माहिती संघर्ष समिती चे अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती प्रा शिवाजीराव बंडगर व सामाजिक कार्यकर्ते अजित विघ्ने यानी पत्रकारांना दिली.

आज दि .17 रोजी जेऊर ता करमाळा येथे उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती च्या वतीने तालुक्यातील मोजक्या कार्यकर्त्यांची बैठक कोरोना ची नियमावली पाळत संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ चे माजी संचालक नवनाथ बापू झोळ हे होते.
या बाबत पुढे बोलताना बंडगर व विघ्ने म्हणाले की, बैठकीत सर्वाना बरोबर घेऊन सर्व पक्षीय लढा देण्याचा विषय चर्चेला आला . तसेच शासन सांडपाण्याच्या नावाखाली या पूर्वी वाटप झालेले पाणीच उजनीतून नेणार असल्याने संपूर्ण करमाळा तालुका व सोलापूर जिल्ह्याचे प्रचंड नुकसान होणार आहे . त्या मुळे शासनाच्या या निर्णयाला तालुक्याच्या वतीने विरोध करण्याचा निर्णय झाला.

शासनाने सांडपाणी उजनीतून न उचलता ते दौंड पासून वर पुण्यापर्यंत कुठेही भिमा नदोवरून उचलून न्यावे अशी सूचना करण्यात आली .

कोरोनामुळे रस्त्यावरची लढाई तूर्तास लढता येत नसली तरी लाॅकडाऊन संपताच मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय झाला .

तथापि शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा या साठी रितसर निवेदन देणे,चर्चा करणे या बरोबरच स्पष्ट विरोध दर्शविण्यासाठी त्रिसुत्री कार्यक्रम करण्याचे ठरले .

त्यात सर्व प्रथम दिनांक 22 मे रोजी तालुक्यातील गावा गावात इंदापूर ला पाणी देण्याच्या प्रस्तावित योजनेला तत्तत: मंजुरी देणार्या 22 एप्रिल च्या आदेशाची होळी सकाळी 9 वाजता कोरोनाचे नियम पाळून करण्याचे ठरले .
दुसर्या टप्प्यात दि 31मे पर्यंत तालुक्यातील ग्रामपंचायती चे ठराव एकत्र गोळा करून करून तहसीलदार कार्यालया मार्फत शासनाला सादर करणे .

तिसर्या टप्प्यात शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा म्हणून तहसीलदार कार्यालया समोर इशारा येण्याकरिता एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणे

या प्रमाणे आंदोलन करण्याचा निर्णय करण्यात आला आहे.

या शिवाय दुसर्या बाजुला न्यायालयात जाण्या ची तयारी करण्याचे ही ठरले .

या वेळी चर्चेत प्रा बंडगर, अॅड अजित विघ्ने,पं स सभापती गहिनीनाथ ननवरे, नवनाथ बापू झोळ, सुनील तळेकर, प्रा अर्जून सरक , सुहास गलांडे, महेंद्र पाटील, गोरख गुळवे,अॅड दिपक देशमुख, तात्या सरडे,,विजय नवले,धुळा भाऊ कोकरे यानी भाग घेतला .

यावेळी सागर खांडेकर, गंगाधर वाघमोडे, राजकुमार देशमुख, संदीप मारकड ,हनुमंत यादव ,धनंजय घोरपडे,शहाजी पाटील, ढोकरी चे सरपंच सचिन खरात, उपसरपंच दत्ता खरात,सदस्य किरण बोरकर, गोपाळ मंगवडे, अजित वगरे,विठ्ठल शेळके, आनंद मोरे,भैया वाघमोडे, शुभम बंडगर, बापू रोकडे, आदित्य बंडगर आदी उपस्थित होते.

 इंदापूर ला उजनीतून सांडपाणी देण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी करमाळा तालुक्यातील सर्व पक्षीय, व सर्व गटाच्या वतीने तीन टप्प्यांत कार्यक्रम करताना पहिल्या टप्प्यात दि 22 मे रोजी तालुक्यातील गावा गावात इंदापूर ला पाणी देण्याच्या प्रस्तावित आदेशाची होळी सकाळी नऊवाजता करणे ,दुसर्या टप्प्यात दि 31 मे पर्यंत ग्रामपंचायती चे ठराव एकत्र गोळा करून तहसीलदार मार्फत शासनाला सादर करणे, तिसर्या टप्प्यात करमाळा तहसीलदार कार्यालयासमोर इशारा म्हणून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणे
असा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती च्या वतीने सांगण्यात आले.

litsbros

Comment here