करमाळाकेमशैक्षणिकसोलापूर जिल्हा

श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी पक्षी संवर्धनासाठी जलपात्र व धान्यपात्राची केली सोय

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी पक्षी संवर्धनासाठी जलपात्र व धान्यपात्राची केली सोय

केम- श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम या ठिकाणी पक्षांसाठी विशेषतः चिमण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून जलपात्र व त्यांचा चारा ठेवण्यासाठी धान्यपात्र ठेवण्यात आले.

यावेळी प्रथम परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री किरणतात्या तळेकर यांनी सध्याच्या या कडक उन्हाळ्यामध्ये हा पक्षांसाठी जलपात्र व धान्यपात्राचा हा उपक्रम खूप गरजेचा असल्याचे सांगितले. श्री राजेश तळेकर यांनी उत्तरेश्वर कॉलेजमधील या नवनवीन उपक्रमांना शुभेच्छा देऊन यातून विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास होतो असे सांगितले.

या ज्युनियर कॉलेजमधील उपक्रमशील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ असे हे जलपात्र व धान्यपात्र बनवून आणले होते. हे जलपात्र व धान्यपात्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेतील व परिसरातील विविध वृक्षांना लावून त्यात धान्य व पाणी ठेवण्यात आले.
यावेळी प्राचार्य श्री सुभाष कदम, शालेय समिती अध्यक्ष श्री वसंत तळेकर , श्री किरणतात्या तळेकर, श्री धनंजय ताकमोगे, श्री राजेश तळेकर, श्री प्रमोद धनवे, सौ. अमृता दोंड, सौ. कल्पना तळेकर, श्री सागर महानवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा – 100 दिवसात 7 वी आवृत्ती; ‘जग बदलणारा बापमाणूस’ ठरले बेस्ट सेलर; गल्ली पासून दिल्ली पर्यंत पुस्तकाची चर्चा !

मी मराठा आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही; दिवेगव्हाण येथे मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार!

या नवोपक्रमासाठी प्रा.डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा.डॉ.संतोष साळुंखे, प्रा.एस.के.पाटील, प्रा.संतोष रणदिवे, प्रा.सतीश बनसोडे, प्रा.पराग कुलकर्णी यांनी सहकार्य केले.

litsbros