आम्ही साहित्यिक महाराष्ट्र मुंबई

‘जग बदलणारा बापमाणूस’ हे नव्या पिढीला प्रेरणादायी भाषेत बाबासाहेब सांगणारे पुस्तक; खा. वर्षा गायकवाड मुंबईत खा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते 13 व्या आवृत्तीचे प्रकाशन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

‘जग बदलणारा बापमाणूस’ हे नव्या पिढीला प्रेरणादायी भाषेत बाबासाहेब सांगणारे पुस्तक; खा. वर्षा गायकवाड

मुंबईत खा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते 13 व्या आवृत्तीचे प्रकाशन

मुंबई(प्रतिनिधी); आजच्या तरुणाईला त्यांच्या भाषेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व सर्व महामानव समजून सांगणे गरजेचे आहे, शून्यातून विश्व निर्माण करणारे बाबासाहेब जर आजच्या पिढीला समजले तर ही पिढी आपल्या आयुष्यात यशाला नक्की गवसणी घालेल, त्यासाठी आजच्या प्रत्येक तरुणाने ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे पुस्तक वाचणे गरजेचे आहे, असे मत माजी मंत्री व नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई येथे बोलताना व्यक्त केले. ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाच्या १३ व्या आवृत्तीचे प्रकाशन खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रेरणादायी व्याख्याते व लेखक जगदीश ओहोळ यांनी लिहिलेले ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाच्या फक्त दीडशे दिवसांमध्ये 13 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. या बेस्ट सेलर प्रेरणादायी पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात डॉ. सुरज एंगडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे, तर पुढील तेराव्या आवृत्तीचे प्रकाशन आज शुक्रवारी मुंबईत खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा – उमरड येथे राजमाता अहिल्याराणी होळकर यांना अभिवादन; दहावीतील गुणवंतांचा ही झाला सत्कार

आवाटी येथील शेतकऱ्याची कन्या ऐश्वर्या वाघमोडे ही विद्यार्थिनी 99.80% गुण मिळवून करमाळा तसेच परंडा तालुक्यात दहावी मध्ये प्रथम

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेस नेते युवराज मोहिते यांनी केले. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत सुरेशचंद्र राजहंस, लेखक जगदीश ओहोळ यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!