करमाळा सोलापूर जिल्हा

मांगी तलाव संदर्भात खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची दिल्लीत महत्वपूर्ण बैठक ‘या’ तारखेपर्यंत तलाव कुकडी प्रकल्पात विलीनकरणं बाबत अहवाल येणार : गणेश चिवटे यांची माहिती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मांगी तलाव संदर्भात खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची दिल्लीत महत्वपूर्ण बैठक ‘या’ तारखेपर्यंत तलाव कुकडी प्रकल्पात विलीनकरणं बाबत अहवाल येणार : गणेश चिवटे यांची माहिती

करमाळा प्रतिनिधी : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अविरत प्रयत्नामुळे १५ जानेवारीपर्यंत मांगी तलाव कुकडी प्रकल्पात विलीनिकरण अहवाल येणार असलेची अधिकृत माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की,मांगी तलावसंदर्भात खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची काल दिल्लीत याबाबत महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे.मांगी तलाव कुकडी प्रकल्पात कायमस्वरूपी विलीन करण्याची मागणी या भागातील नागरिक गेली ५० वर्ष करीत होते.परंतु या मागणीला यश येत नव्हते परंतु माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विलिनी करणासंदर्भात गत जून- २०२३ मध्ये मागणी केली होती.

खासदारांनी यामध्ये लक्ष घालून संपूर्ण कुकडी प्रकल्पाचे फेरजलनियोजन करण्याचे नियोजन केले.यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून घेतला.केंद्र सरकारच्या वेबकॉस या संस्थेमार्फत अवघ्या ६ महिन्यात फेरजलनियोजन अहवाल बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.याबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची काल वेबकॉस संस्थेचे CEO शंभु आझाद यांच्यासोबत दिल्ली येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे.

या संस्थेचा अहवाल १५ जानेवारीपर्यंत तयार होऊन मांगी तलाव कुकडी प्रकल्पात अधिकृतरित्या कायमस्वरूपी विलीन होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.मांगी तलाव कुकडी प्रकल्पात विलीन झाल्यानंतर या तलावावर अवलंबून असलेल्या २५-३०गावांतील शेती व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.

हेही वाचा – लेखक जगदीश ओहोळ यांनी घेतली श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची भेट; ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक दिले भेट

भिगवण जवळ कुर्ला एक्सप्रेसचे इंजिन बिघडले : तासभर वाहतूक विस्कळीत

करमाळा,जामखेड,कर्जत,परांडा या भागातील बाजार समिती व सर्व साखर कारखाने,दुग्ध व्यवसाय यासह सर्वच छोट्या- मोठ्या व्यावसायांना सोन्याचे दिवस येणार आहेत.करमाळा शहर व परिसरातील लोकांमध्ये मोठी भरभराट होणार आहे असे चिवटे यांनी शेवटी सांगितले.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!