दिवाळीमध्ये रांगोळीनेही उधळले रंग: रांगोळी महागली
केत्तूर (अभय माने) दिवाळी हा सण दिव्यांचा उत्साह असणारा सण. घराबाहेर विविध रंगाची उधळण करणारी रांगोळी या सणाचे मोठं वैशिष्ट्ये त्यामुळे दिवाळीला कपडे खरेदी, आकाश कंदील, पणती, फटाके याबरोबरच रांगोळीचे महत्त्वाचे स्थान आहे या रांगोळीलाही इतर जीन्स प्रमाणे महागाईचे ग्रहण लागले आहे त्यामध्ये सरासरी दहा टक्के च्या आसपास वाढ झाली आहे.
यापूर्वी पूजा साहित्य आणि गोष्टीवर जीएसटी नसल्यामुळे त्याचे दर सर्वसामान्याच्या आवाक्यात होते मात्र मॉडर्न पणत्या तसेच रांगोळीलाही जीएसटी 12 टक्के अधिकार लावल्याने रांगोळीच्या दरात वाढ झाली आहे पांढरी रांगोळी मिळत होती ती सध्या दहा ते बारा रुपये किलो प्रमाणे घ्यावी लागत आहे.
तसेच रांगोळीच्या रंगातही वाढ झाली आहे ते पंधरा वीस रुपयावर गेले आहेत राजस्थान, गुजरात यासारख्या राज्यातून रांगोळीची आवक होत असते त्यामुळे दरामध्ये वाढ झालेली असल्याने घरांसमोर मोठ्या रांगोळीची जागा आता छोट्या रांगोळीने घेतली आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळी हे मांगल्य आणि आनंदाचे प्रतीक मानले जात असल्याने दिवाळीच्या सणात रांगोळीला मोठे महत्त्वाचे स्थान आहे.
” रांगोळी काढणे ही एक कला आहे दिवाळीमध्ये व इतर क्षणांमध्ये गृहिणी व मुली उपलब्ध होत असतात त्यामुळे रांगोळी काढतात.रांगोळी शिवाय दिवाळीच नाही त्यामुळे दिवाळी आणि रांगोळी यांचे अतूट नाते आहे.
– चैताली माने,केत्तूर
हेही वाचा – नेरले परिसरात महावितरणच्या सहा महिन्यापासून तुटलेल्या तारा व डीपी आता तरी जोडा
केतूरच्या सरपंचपदी सचिन वेळेकर तर ‘हे’ आहेत इतर विजयी उमेदवार; क्लिक करून वाचा सविस्तर
‘या दिवाळीमध्ये रांगोळीने रंग उधळल्याने महिलांनी रांगोळीलाही हात आखडता घेतला आहे.महागाई सगळीकडेच आपला रंग दाखवत आहे.
-संगीता कटारिया,केत्तूर
छायाचित्र- रांगोळी (संग्रहीत)
Add Comment