आरोग्य करमाळा शैक्षणिक

पोथरे शाळेत स्वच्छता रॅली उत्साहात संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पोथरे शाळेत स्वच्छता रॅली उत्साहात संपन्न

    

करमाळा (प्रतिनीधी):  दि. १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत शासनाद्वारे ‘ स्वच्छता पंधरवडा’ हा एक कल्पक आणि अभिनव उपक्रम राबवला जातोय . या उपक्रमांतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष , जि. प. सोलापूर या विभागाने सूचित केल्यानुसार आज जि.प.प्रा. केंद्रशाळा पोथरे व्दारा गावपातळीवर ‘स्वच्छता रॅली’ काढण्यात आली. रॅलीमधे विद्यार्थ्यांनी ढोलताशासह जनजागृतीपर संदेशात्मक घोषणा फलक हातात घेऊन व घोषणा देऊन गावपातळीवर वातावरण निर्मिती केली.

रॅलीच्या समारोपावेळी मा. BDO भोंग साहेब यांनी आपल्या जीवनातील स्वच्छतेचे अनन्यसाधारण महत्व व स्वच्छतेच्या अभावी होणारे आजार याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . शालेय वयात झालेले संस्कार विद्यार्थ्यांना आयुष्यभर पुरतात त्यामुळे या उपक्रमामधे विद्यार्थ्यांची भूमिका का व कशी महत्वाची आहे हे उपस्थितांना समजावून सांगितले तर मुख्याध्यापक श्री. गजेंद्र गुरव सर यांनी पोथरे शाळा स्वच्छता पंधरवड्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम व तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करणार असलेबाबतची माहिती वरिष्ठांना दिली. या रॅलीमधे केंद्रशाळा पोथरेतील सर्व विद्यार्थी, करमाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष विद्यमान गटविकास अधिकारी श्री. राजाराम भोंग साहेब, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष चे अभियंता श्री. खत्री साहेब, मा. सरपंच श्री. धनंजय झिंजाडे, ग्रामपंचायत सदस्य श्री. पाराजीआबा शिंदे,ग्रामसेवक श्री .हरिभाऊ दरवडे, मुख्याध्यापक श्री. गजेंद्र गुरव ,शिक्षक वृंद श्री. दत्तात्रय मस्तूद, श्रीम. शगुफ्ता हुंडेकरी, श्रीम. शाबिरा मिर्झा, श्री. बापूराव रोकडे, श्रीम. सविता शिरसकर , प्रतिष्ठित ग्रामस्थ श्री. हमीद भाई शेख हे आवर्जून उपस्थित होते.सूत्रसंचालन श्रीम. शगुफ्ता हुंडेकरी यांनी केले . विषय शिक्षक श्री. दत्तात्रय मस्तूद यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!