Uncategorized

मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावल्यास खराब होतो का? जाणून घ्या…

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावल्यास खराब होतो का? जाणून घ्या…

आज टेक्नोलॉजिच्या युगात मोबाईल वापरकर्त्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. अशात मोबाईल नेमका कधी आणि किती वेळ चार्ज करावा? रात्रभर मोबाईल चार्ज केल्यानं त्यातल्या बॅटरीवर परिणाम होतो का? त्यामुळे बॅटरी लवकर खराब होते का? बॅटरीचा स्फोट होऊ शकतो का? असे अनेक प्रश्न अनेकांना नेहमीच पडत असतात.

परंतु, आजकालच्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये अशी खास यंत्रणा असते, की जी मोबाईल फोन फुल चार्ज झाल्यावर बॅटरीला होणारा वीजपुरवठा बंद करते. असं असलं तरी लोकांनी रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावू नये, असं तज्ज्ञ सांगतात.

अनेकजण रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावतात आणि दिवसभर त्याचा वापर करतात. मात्र, मोबाईलची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 6 ते 8 तास नक्कीच लागत नाहीत. नवीन फोनमध्ये स्मार्ट टेक्नोलॉजी असली तरी जुने फोन तितके अवगत नाहीत. जुन्या फोनमध्ये चार्जिंग पूर्ण झाल्यानंतरही चार्जिंग सुरू ठेवल्यास बिघाड होण्याची शक्यता असते. परंतु, अलीकडच्या स्मार्टफोनमध्ये स्मार्ट यंत्रणा असल्याने असं होण्याची शक्यता जवळपास नसते.

चार्जिंगच्या वेळी मोबाईल गरम झाला तर काही जण घाबरतात. परंतु, ही भिती व्यर्थ असते. यात भीतीचं काहीच कारण नसतं.

तज्ज्ञांच्या मते, लिथियम आयन बॅटरीत (Battery) चार्जिंगदरम्यान रासायनिक क्रिया होतात. बॅटरीतल्या पॉझिटिव्ह (+) चेंबरमधील आयन निगेटिव्ह (-) चेंबरकडे प्रवाहित होतात आणि त्यामुळे बॅटरी गरम होते. तसंच मोबाईलची मागची बाजू गरम होते.

सध्या उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनमध्ये चार्जिंग सर्किट बसवण्यात आलेलं असतं, त्यामुळे बॅटरी पूर्ण म्हणजेच 100 टक्के चार्ज झाल्यावर वीजपुरवठा घेणं बंद करते.

बहुतांश स्मार्टफोनमध्ये स्मार्ट प्रोसेसर (Snapdragon Processor) असतो. त्यामुळे एखाद्या दिवशी रात्रभर चुकून स्मार्टफोन चार्जिंगला राहिला तरी काळजी करण्याचं कारण नाही. परंतु, रात्रभर मोबाइल चार्जिंग सुरू न ठेवणं अधिक सोयीस्कर असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!