Uncategorized

दुर्दैवी! दोन जीवलग मित्रांचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समजताच तिसऱ्या मित्रानेही सोडला प्राण 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दुर्दैवी! दोन जीवलग मित्रांचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समजताच तिसऱ्या मित्रानेही सोडला प्राण 

लातूरमधून अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे. बाईकवर कामावर जाण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू झाला आहे. दोन मित्रांच्या मृत्यूची बातमी ऐकून तिसऱ्या मित्राचाही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

लातूर-तुळजापूर महामार्गावर उजनीजवळ हा अपघात झाला. या अपघातात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. चंद्रकांत नगराळे (वय-28) आणि सुर्यदिप शिंदे (वय-24) अशी मृतांची नावं आहे.

दोघेही उजनी इथल्या एका हॉटेलमध्ये कामाला होते. नेहमीप्रमाणे दोघे आजही ते उजनी जवळच्या टाका येथून मोटारसायकल वरून कामावर निघाले होते. मात्र प्रवासादरम्यान महामार्गावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते. दरम्याना दोघांचाही जागीच मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती दोघांचाही मित्र असलेल्या गोपाळ खंडाळकरला मिळाली. मात्र याचा त्याला जबर मानसिक धक्का बसला. यामुळे त्याचाही उजनी येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी या तिघा मित्रांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

litsbros

Comment here