Uncategorizedमाढाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

श्री खेलोबा देवाच्या सभामंडपात मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरवला आनंद बाजार रणजितभैया शिंदे यांच्या हस्ते आर ओ प्लांटचेही उद्घाटन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री खेलोबा देवाच्या सभामंडपात मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरवला आनंद बाजार

रणजितभैया शिंदे यांच्या हस्ते आर ओ प्लांटचेही उद्घाटन

 माढा प्रतिनिधी 

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अंजनगाव खेलोबा येथे बाल आनंद बाजार भरवण्यात आला.याचबरोबर
विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून पंचायत समिती सभापती शेष फंडातून उभारण्यात आलेल्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे (R.O.Plant) लोकार्पण व या आनंदी बाजार चे उद्घाटन, सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे लोकप्रिय चेअरमन माननीय  रणजितभैय्या शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

व्यवहार ज्ञानाबरोबर संवाद कौशल्य जोपासने विदयार्थ्यांसाठी महत्वाचे आहे.यासाठी या बाल आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.
बाल आनंद बाजारामध्ये विविध प्रकारच्या पालेभाज्या विविध प्रकारची फळे तसेच खवय्यांसाठी खमंग पदार्थ विकण्यासाठी ठेवण्यात आले होते.गावाकऱ्यांनी या चिमुकल्यांकडून अनेक वस्तू खरेदी केल्या.

या बाल आनंद बाजारासाठी सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन रणजितभैया शिंदे यांची उपस्थिती होती.रणजितभैयांनी जिल्हा परिषद शाळेस भेट दिली.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळा दुरुस्ती व सुशोभीकरणाची मागणी करण्यात आली.ही मागणी पूर्ण करण्यासाठी आपण निधी मिळवून देण्याचे आश्वासन रणजितभैया यांनी शाळा व्यवस्थापन समितीस दिले.


यावेळी उपळाई (खुर्द )चे सरपंच संदीपभैय्या पाटील, अंजनगावचे सरपंच प्रतिनिधी प्रदीपभैय्या चौगुले, उपसरपंच शिवाजीराव वाघमोडे, माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सज्जनराव जाधव, माजी सरपंच भागवत नाना चौगुले, चेअरमन पांडुरंग चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे उपाध्यक्ष विनायक चौगुले, नूतन ग्रामपंचायत सदस्य शुक्राचार्य लटके, महादेव गडेकर,शाळा व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष प्राध्यापक विनायक जाधव सर,उपाध्यक्ष .ताई शंकर वाघमोडे, सदस्या अन्नपूर्णा क्षीरसागर,तानाजी पाटेकर, रवींद्र इंगळे,चंद्रकांत भैय्या पाटेकर, सुधाकर पाटेकर,

हेही वाचा – अठरा वर्षांनी एकत्रित येत माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा श्री खिलोबा विद्यालयातील सन 2004 – 2005 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

भाजपची करमाळा शहर कार्यकारिणी जाहीर; वाचा कुणाला कोणती जबाबदारी!

सोसायटी चेअरमन धनराज पाटेकर, सुरेश जाधव, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे परचेस ऑफिसर सचिन चौगुले साहेब,चेअरमन दत्तात्रय पाटेकर,किरणभैय्या पाटेकर, चेअरमन राजाभाऊ जाधव, दिगंबर जाधव, धनाजी मालक इंगळे, शशांक पाटेकर,शशिकांत देशमुख, विठ्ठल कोळेकर, विलास चव्हाण ,चंद्रकांत देवकते, संतोष चौगुले,मुख्याध्यापक बब्रुवान काशीद गुरुजी, हनुमंत शेंडगे गुरुजी, संतोष महामुनी सर, मेघा बारस्कर मॅडम,धनाजी कवले सर,संदीप काशीद सर, चिपडे सर, भारत पाटेकर सर,अंकुश लटके ,बिरुदेव वाघमोडे ,जीवन जाधव,हिराचंद रावडे ,तानाजी पाटेकर, अतुल काळे, तुकाराम लटके, रवींद्र काटे, अनिकेत जाधव,लखन डोके, अजिंक्य पाटील, नागेश पाटोळे, रामचंद्र मोहिते, आण्णासाहेब पाटोळे,व ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते.

litsbros