*140 कोटी रुपये खर्च करून केलेल्या रस्त्याची वाशिंबे चौफूला दरम्यान 4 किमी साईड पट्टी उकरली*.
केत्तूर (अभय माने) महाराष्ट्र रस्ते विकास कार्यक्रमा अंतर्गत 140 कोटी रुपये खर्च करून मागील दोन वर्षापूर्वी कुंभेजफाटा ते रामवाडी रस्त्यांचे डांबरीकरण रुंदीकरण पूर्ण झालेल्या मार्गावर वाशिंबे चौफूला ते ऊमरड दरम्यान सद्या केबल टाकण्यासाठी जेसीबी मशीन द्वारे साईडपट्टीचे खोदकाम सुरु आहे.सदर मशीन द्वारे केबल टाकण्यासाठी अंदाजे 4 कि.मी साईड पट्टी खोदून डांबरी रस्त्याच्या कडेला मुरुम टाकला जात आहे.यामुळे डांबरी रस्त्याच्या एका बाजूला जागो जागी मुरुम मिश्रीत माती व लहान मोठे दगड पडले असून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
कुंभेजफाटा ते जिंती रामवाडी रस्ता विकसित झाल्यामुळे या मार्गावर वेगवान वाहतूक सुरू झाली असून सतत वाहनांची वर्दळ असते.विशेषतः याच रस्त्यावरून ऊस वाहतूक करणार्या वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात होत असते. हा रस्ता भिगवण बारामती कडे जाणारा मुख्य रस्ता आहे. एका मोबाईल कंपनीचे रस्त्याच्या कडेला भूमिगत केबल टाकण्याचे काम चालू आहे. हे काम करण्यासाठी खोदकामाला सुरुवात झाली आहे. खोदकामामुळे नुकतेच झालेल्या रस्त्याच्या साईड पट्टीचे नुकसान झाले असून वाहनचालकांना देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे.यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
खोदकामानंतर साईड पट्टी दाबून व्यवस्थित करणे आवश्यक आहे.पण खोदकाम करणारे त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
रस्ते खोद्काम करताना बॅरिगेट लावून,कामाची माहिती देणारा फलक लावणे आवश्यक आहे,पण ही माहिती दिली जात नाही. खोदकाम आणि त्यानंतरची दुरुस्ती,नव्याने साईड पट्टी दुरुस्ती करणे या कामांचे नियोजन करण्यासाठी संबंधित विभागाकडून नियोजन होत नसल्याचे दिसून येत आहे.
केबल टाकण्याच्या कामामुळे या मार्गावरील साईड पट्टी वरील दोनशे मीटर स्टोन,किलोमीटर स्टोन,कॅट आईझ,क्रश बॅरियर, सुरक्षा फलक व बाजू पट्ट्या.यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाला ‘लोकराजा शाहू पुरस्कार’ ; इचलकरंजी येथे झाला सन्मान
” वाशिंबे चौक ते मांजरगाव दरम्यान नुकसान झालेल्या रस्त्याची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागा कडून करण्यात आली आहे.याबाबत करमाळा बांधकाम उपअभियंता यांना पत्र दिले असून संबधितांवर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.
– सुनिता पाटील. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलुज