करमाळासोलापूर जिल्हा

व्याख्याते जगदीश ओहोळ यांचा माजी सनदी अधिकारी इ झेड खोब्रागडे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मान!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

व्याख्याते जगदीश ओहोळ यांचा माजी सनदी अधिकारी इ झेड खोब्रागडे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मान!

करमाळा(प्रतिनिधी); महाराष्ट्रभर प्रबोधनात्मक व्याख्यानांच्या माध्यमातून प्रबोधनाचा झंझावात निर्माण करणारे, शिव फुले शाहू आंबेडकर विचारांचे प्रेरणादायी व्याख्याते, करमाळा तालुक्यातील हिवरे गावचे सुपुत्र जगदीश अशोक ओहोळ यांचा पुणे येथे ‘प्रबोधनकार पुरस्काराने’ माजी सनदी अधिकारी इ.झेड.खोब्रागडे व माजी पोलिस अधिक्षक, विचारवंत संजय अपरांती यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कवी, लेखक व व्याख्याते म्हणून प्रसिद्ध असणारे जगदीश ओहोळ हे आपल्या व्याख्यान, लेख, कविता मधून सामाजिक प्रबोधन करीत आहेत तर “जगदीशब्द फाउंडेशन”च्या माध्यमातून त्या शब्दांना प्रत्यक्ष कार्याची जोड देत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पुणे येथे महात्मा फुले सभागृहात रेखाआई लगड यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिवनरेखा भाग 2 व अंधश्रद्धेतून धम्माकडे प्रकाशमय वाटचाल या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जगदीश ओहोळ यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

हेही वाचा – मा.आ.जयवंतराव जगताप यांचे पुत्र व माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश; उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बांधले शिवबंधशिवबंध

केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयात गुरुजन कृतज्ञता आणि माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

यावेळी मानवतावादी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शिवदास म्हसदे, ज्येष्ठ नेते वसंतराव साळवे, यशदाचे प्रकल्प अधिकारी बबन जोगदंड, सौ रेखाआई लगड सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप लगड, बालाजी गायकवाड, मारुती कांबळे, मच्छिंद्र गायकवाड, शाहीर संभाजी गायकवाड आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

litsbros

Comment here