करमाळासोलापूर जिल्हा

मा.आ.जयवंतराव जगताप यांचे पुत्र व माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश; उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बांधले शिवबंधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मा.आ.जयवंतराव जगताप यांचे पुत्र व माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश; उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बांधले शिवबंधन

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा शहर व तालुक्याच्या राजकारणावर कायम पकड असलेल्या जगताप घराण्यातील वैभवराजे जगताप यांनी आता नवा डाव मांडला आहे. मूळचे काँग्रेसी घराणे असलेल्या जगताप यांचे आजोबा कै .नामदेवराव जगताप हे काँग्रेसचे राज्यातील महत्वाचे नेते होते. त्यांचे नातू व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव असलेल्या वैभवराजे यांनी हाती शिव बंधन बांधल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

माजी नगराध्यक्ष वैभवराजे यांनी मुंबई येथील सेना भवन येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे.

माजी नगराध्यक्ष वैभव राजे जगताप तसेच माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी यांना शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे यांनी शिवबंधन बांधले.

 यावेळी जगताप यांचे कार्यकर्ते सचिन अब्दुले, बाळासाहेब बलदोटा बाळासाहेब कांबळे गणेश कुकडे शहाबाज घोडके आधी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आचार विचार आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम निष्ठेने करू असे शिवसेनेत प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी बोलताना सांगितले.

litsbros

Comment here