करमाळामाढासोलापूर जिल्हा

करमाळा माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठी धरणग्रस्तांच्या हक्काचे पाणी संरक्षित करण्याची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठी धरणग्रस्तांच्या हक्काचे पाणी संरक्षित करण्याची मागणी

करमाळा (प्रतिनिधी-आलिम शेख) ; करमाळा-माढा तालूक्यातील शेतकऱ्याची पिके वाचवण्यासाठी
धरणग्रस्तांच्या हक्काच्याè पाण्याचे संरक्षीत करा अशी विनंती पाटील गटाकडून प्रशासनास करण्यात आली आहे.

यावेळी पाटील गटाचे प्रवक्ते तळेकर यांनी सांगितले की सध्या उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडणे चालू आहे. या पाण्याचे मोजमाप व नियोजन याचा अभाव असल्याने भरमसाठ पाणी सोडले जाते. याचा फटका करमाळा तालुक्यातील व माढा तालुक्यातील बोगद्यावरील शेतकऱ्यांना बसतो. उजनी धरणाच्या निर्मितीसाठी करमाळा तालुक्यातील गावे पाण्याखाली गेली.

लवादाने धरणग्रस्तांसाठी दोन टिएमसी पाणी राखून ठेवले. पण उजनी गाळयुक्त असल्याने धरणग्रस्तांचे अधिकार त्यांना मिळवून दिले जात नाहीत. सोलापुर शहरास पिण्याच्या नावाखाली पाणी सोडले जाते, आषाढी व कार्तिकी वारी नजरेसमोर ठेऊनही नदीपात्रात पाणी सोडले जाते.

पण याचे प्रमाण अधिक असल्याने करमाळा तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत येतो. दरवर्षी माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना विनवणी करते.धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांना रस्त्यावर उतरावे लागते.

कारण पाणीपातळी खाली गेल्यास पाईप टाकणे, चारी खांदून पाण्यापर्यंत पोहचणे, प्रत्यक्ष पाण्यापर्यंत वीजेचे पोल उभारणे या गोष्टीचा अनावश्यक खर्च धरणग्रस्तांचे माथी पडतो. माढा तालुक्यातील बोगदाकाठी हीच परिस्थिती निर्माण होते. एवढे होऊनही महावितरणकडून वीजपुरवठा दोन तासावर आणला जातो. या सगळ्या गोष्टींचा विचार करुन कायमस्वरूपी या समस्येवर तोडगा निघावा अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.

आजमितीस करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजना, धरणग्रस्तांचा उजनी पट्टा व सीना-भीमा जोडकालवा अर्थात बोगदा यावरील शेतकरी हा ऊस व खास करून केळी सारखी नगदी पिके घेत आहेत. पाण्याची मागणी भरपुर आहे.

अशात उजनीतुन खाली नदीपात्रात जाणारे पाणी थांबले नाही तर शेकडो कोटी रुपयांची पिके धोक्यात येतील. यामुळे मग शेतकऱ्याची बाजू घेण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वेळप्रसंगी आंदोलन करावयाची वेळ आली तरी पाटील गट यास तयार असेल.

हेही वाचा – केम येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, डोळे तपासणी व आधार अपडेट आदी उपक्रम

नगरला हमाल मापाडी राज्यव्यापी द्वैवार्षिक अधिवेशनासाठी करमाळा येथून कार्यकर्ते मोठ्या संख्येने जाणार: ॲड राहुल सावंत यांची माहिती

उजनीच्या पाणी नियोजन समितीत धरणग्रस्तांचा एक प्रतिनिधी असावा, पाणी पातळी खाली गेल्यास प्रत्यक्ष पाण्यापर्यंत शेतकऱ्याला शासनाकडून मोफत वीजेचे पोल टाकले जावेत व तारा ओढून दिल्या जाव्यात ही मागणी यापूर्वीच माजी आमदार नारायण पाटील यांनी केली असून याचा पाठपुरावा सुरू असल्याचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.

litsbros

Comment here