माढाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रूक येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रूक मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

माढा प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.उपळाई बुद्रुकच्या तलाठी सौ.पल्लवी भास्करे मॅडम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. सनदी लेखापाल (Chartered Accountant) कु.ज्योती राऊत मॅडम,समाजसेविका श्रीम.शशिकला नकाते मॅडम या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

उपळाई बुद्रुकच्या तलाठी सौ.पल्लवी भास्करे मॅडम, सनदी लेखापाल कु.ज्योती राऊत मॅडम,समाजसेविका श्रीम.शशिकला नकाते मॅडम यांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,रयतमाऊली सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सनदी लेखापाल कु.ज्योती राऊत मॅडम,समाजसेविका श्रीम.शशिकला नकाते मॅडम व विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री शब्बीर तांबोळी सर यांनी आपल्या मनोगतातून जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगितले.

शिक्षणप्रेमी श्रीम.वत्सला शिंदे यांनी महिलांना प्रेरणा देणाऱ्या गीताचे गायन केले.तसेच विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली.याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनींनी विविध ऐतिहासिक स्त्रियांची पात्रे साकारली होती.यावेळी उपळाई बुद्रुक च्या तलाठी सौ.पल्लवी भास्करे मॅडम यांच्यासह उपस्थित सर्व महिला प्रमुख पाहुण्यांचा व उपस्थित माता-भगिनींचा तसेच विद्यालयातील सर्व महिला शिक्षकांचा विद्यालयाचे वतीने सत्कार करण्यात आला.


यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य श्री भारत (आप्पा) घाडगे,विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री दशरथ देशमुख साहेब,सेवानिवृत्त शिक्षक श्री शिवाजी लोंढे सर व श्री रामचंद्र माळी सर,सांस्कृतिक विभागप्रमुख श्री शब्बीर तांबोळी सर,सौ मेघाताई शिंदे,सौ रूपालीताई माळी,सौ.रोहिणीताई शिंदे,

हेही वाचा – उजनी लाभक्षेत्रात वातावरणात वारंवार बदल!

पालकमंत्री चंद्रकांतदादा व खा. निंबाळकर यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधून करमाळा तालुक्यातील विविध विकास कामासाठी ‘इतका’ निधी मंजूर – गणेश चिवटे

विद्यालयातील महिला शिक्षिका श्रीम.सुनिता बिडवे मॅडम,सौ.शिल्पा खताळ मॅडम,सौ.शबनम आतार मॅडम,कु. ऐश्वर्या फडतरे मॅडम, श्रीम.शितल भास्करे मॅडम,श्रीम.दमयंती शिंदे मॅडम यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी आदी उपस्थित होते. समृद्धी कुलकर्णी,सिद्धी शिंदे, अमृता पाटील व वैष्णवी शिंदे या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.

litsbros