करमाळासोलापूर जिल्हा

उजनी लाभक्षेत्रात वातावरणात वारंवार बदल!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उजनी लाभक्षेत्रात वातावरणात वारंवार बदल!

केत्तूर (अभय माने) गेल्या काही दिवसापासून करमाळा तालुक्याचे उजनी लाभक्षेत्र परिसरात वातावरणात वारंवार बदल होत आहे. गेल्या आठ दिवसापासून थंडी गायब होऊन उन्हाळ्याची चाहूल लागली होती परंतु, सोमवार (ता.4) पासून अचानकपणे पहाटे थंडी, दुपारी कडाक्याची ऊन तर सायंकाळी ढगाळ वातावरण अनुभवास मिळत आहे.

या विचित्र हवामानामुळे नागरिक मात्र पार वैतागून गेले आहेत. यापुढे किमान व कमाल तापमानातही वाढ होणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविली आहे.बेमोसमी वातावरणामुळे शेतातील उभ्या पिकावर मात्र विपरीत परिणाम होत आहे.

हेही वाचा – रेल्वे थांब्यासाठी रेलरोको; करमाळा तालुक्यातील ‘ही’ ७ गावे टाकणार लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार

वीट येथे रिटेवाडी उपसासिंचन योजनेसाठी रस्ता रोको आंदोलन  आचार संहिता पूर्वी योजना मार्गी लागली नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार -शेतकऱ्यांचा एल्गार

कांदा पिकाला रोगराईने ग्रासले आहे.त्यामुळे औषधांच्या खर्चात मात्र वाढ होत आहे.तर नागरिकांनाही बदलत्या वातावरणाचा त्रास होत आहे. रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

litsbros