करमाळासोलापूर जिल्हा

पालकमंत्री चंद्रकांतदादा व खा. निंबाळकर यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधून करमाळा तालुक्यातील विविध विकास कामासाठी ‘इतका’ निधी मंजूर – गणेश चिवटे

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पालकमंत्री चंद्रकांतदादा व खा. निंबाळकर यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधून करमाळा तालुक्यातील विविध विकास कामासाठी ‘इतका’ निधी मंजूर – गणेश चिवटे

करमाळा – सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व माढा लोकसभा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा नियोजनमधून करमाळा तालुक्यातील विविध विकास कामासाठी ७५ लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा भाजपा जि सरचिटणीस गणेश चिवटे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की,करमाळा तालुक्यातील विविध गावात विकास कामांसाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विशेष लक्ष आहे त्यामुळे भविष्यात आपण तालुक्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणणार आहोत असे चिवटे यांनी सांगितले.

आता विकासनिधी मिळालेल्या गावामध्ये कोंढज येथील खत्री दुकान ते महादेव मंदिर रस्ता ३ लाख रु,भैरवनाथ मंदिर छबीना मार्ग रस्ता ४ लाख रु,सरपडोह नलवडे वस्ती ते दत्त मंदिर रस्ता ४ लाख रु, निमगाव येथील निमगांव बस स्टॅन्ड ते पठाडे वस्ती रस्ता ४लाख रु,पांडे येथील मस्जिद रस्ता ४लाख रु, सावतामाळी रस्ता ४लाख रु, महाडिक वस्ती येथील रस्ता १० लाख रु,,शेलगाव क. येथील नागनाथ मंदिर ते चोपडे वस्ती रस्ता ४ लाख रु,वंजारवाडी येथील पिंपळाचा रस्ता ५ लाख रु, वसंत बिनवडे घर ते गणेश कराड घर रस्ता १.५० लाख रु,मोरवड येथील स्मशानभूमीसाठी ५ लाख रु,

हेही वाचा – परदेशी दांपत्याकडून श्रीराम प्रतिष्ठानचे आभार ,प्रतिष्ठानच्या वतीने परदेशी दांपत्याचा लग्नाचा वाढदिवस साजरा

लेखिका डॉ. प्रचिती पुंडे यांना 2024 चा इंस्पीरेशनल बुक अवॉर्ड प्रदान; करमाळा येथे इंग्रजी भाषा कार्यशाळेत झाला सन्मान

खडकी येथील एस.टी.स्टॅन्ड ते महादेव मंदिर रस्ता ७ लाख रु,अंजनडोह येथील मसोबा मंदिर रस्ता ६लाख रु,शेळके वस्ती रस्ता ४लाख रु.,खडकेवाडी अक्षय शेळके घर ते विक्रम शेळके रस्ता घर रस्ता १.५ लाख रु,कोळगाव येथील आतकरे वस्ती सुरवसे वस्ती पाटील वस्ती,गौंडरे कोळगाव शिव रस्ता ४ लाख रु,आळजापुर येथील जातेगांव रस्ता ते बुवासाहेब काळे घर रस्ता ४ लाख रु आदी विकास कामांचा समावेश आहे.

litsbros