केमसांस्कृतिकसोलापूर जिल्हा

केम येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, डोळे तपासणी व आधार अपडेट आदी उपक्रम

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, डोळे तपासणी व आधार अपडेट आदी उपक्रम

केम (प्रतिनिधी संजय जाधव);
केम तालुका करमाळा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मल्लिका जृर्न रक्त पेढी सोलापूर व बुधराणी हाॅस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात एकूण साठ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

सुरूवातीला संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सरपंच युवा नेते अजितदादा तळेकर उपसरपंच नागनाथ तळेकर यांच्या हस्ते झाले
यावेळी ए,पी, ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटील, गणेश आबा तळेकर, वसंत तळेकर, डॉ जांभळे, अमोल तळेकर सर बालाजी आवताडे संदिप तळेकर, उदय बापू तळेकर, बबलू सुरवसे, मंगेश तळेकर, शिवाजी पाटील सोनू खडके अनिकेत गोडगे युवा सेनेचे सागर तळेकर महावीर आबा तळेकर , विकास कळसाईत आदि उपस्थित होते.

या प्रसंगी या शिबिराचे अयोजक समीर भैय्या तळेकर म्हणाले की आज महाराष्ट्र राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे रूग्णाला रक्ताची गरज भासत आहे याची गरज ओळखून रक्तदान शिबिर आयोजित केले आहे रक्त दान हे श्रेष्ठ दान आहे.
आपल्या रक्तामळे एखाद्या रूग्णाचा जीव वाचतो याचे सारखे पुण्य कस्यात नाही असे ते म्हणाले या वेळी त्यांनी रक्तदात्याचे आभार मानले.

हेही वाचा – केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयात गुरुजन कृतज्ञता आणि माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

करमाळा नगरपरिषदेवर ‘या’ मागण्यांसाठी हलगी मोर्चाचे आयोजन; करमाळा शहर विकास आघाडी आक्रमक

या शिबिरात एकूण शंभर महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिक यांनी डोळे तपासणी चा लाभ घेतला तसेच आधार अपडेट चा सुध्दा या वेळी ज्येष्ठ नागरिक याना जेवणाची व्यवस्था मंडळाच्या वतीने करण्यात आली होती आधार अपडेट साठी भैरू शिंदे सोनू खडके यानी काम पाहिले.

तसेच हे संपूर्ण शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष दत्ताभाऊ तळेकर ओंकार जाधव यांनी परिश्रम घेतले. या सामजिक उपक्रमाचे केम परिसरात कौतुक केले जात आहे.

 

litsbros

Comment here