आम्ही साहित्यिकधार्मिकमहाराष्ट्र

रमजानुल विशेष भाग ७ कुरआन -३० पारे, ११४ सुरए

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

रमजानुल विशेष भाग ७
कुरआन -३० पारे, ११४ सुरए

जगभरात सर्वात जास्त वाचला जाणारा ग्रंथ म्हणजे कुरआन शरीफ होय.संपूर्ण वर्षभर दररोज वाचला जाणारा हा ग्रंथ जगभरातील प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भाषेत उपलब्ध आहे हे याचे वैशिष्ट्य आहे.

हजरत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या प्रेषित्वाच्या काळामध्ये जसे जसे प्रसंग आले,त्यानुसार अल्लाहने आपल्या देवदूतामार्फत मार्गदर्शनपर सूचना कुरआनच्या रूपात हजरत पैगंबरांपर्यंत पोहोचविल्या.कुरआन शरीफचे ३० खंड (पारे) असून यामध्ये ११४ सुरए आहेत. प्रत्येकाला स्वतंत्र नाव आहे.

सर्वात पहिली सुरत सुर ए फातिहा असून कुरआन शरीफचा प्रारंभ सूरए फातिहा ने झाला आहे. मक्का आणि मदिना अशा दोन्ही ठिकाणी ही सुरत अवतीर्ण झाली आहे.सर्वात जास्त पठण करण्यात येणारी सुरत म्हणून सुर ए फातेहाची ख्याती आहे. प्रत्येक नमाजमध्ये प्रत्येक रकअतमध्ये याचे पठण केले जाते.

सुरए फातिहा ची पंधरा नावे आहेत. यावरून तिचे महत्त्व लक्षात येते.
कुरआन मधील प्रत्येक सुरत चे विश्लेषण (तफसीर) करण्यात आलेले आहे. वारंवार वाचन आणि पठण करून कुरआन शरीफ समजून घेतल्यास प्रत्येक प्रश्नाची उकल त्यातून प्राप्त होते.जीवनात कुरआन शरीफ मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन केल्यास आपल्याला योग्य तो मार्ग सापडतो.

जगातील सर्व प्रश्नांचा उहापोह कुरआनमध्ये करण्यात आलेला आहे. मात्र त्याला चिंतन-मनन आणि विश्लेषण करून समजून घेण्याची आवश्यकता आहे. प्रेषित हजरत पैगंबरांनी त्यांना प्राप्त झालेले ज्ञान आपल्या अनुयायांमार्फत लोकांपर्यंत पोहोचविले आहे.
सुरए फातिहा मध्ये सात आयत असून २७ शब्द व १४० अक्षरे आहेत.

अरबी भाषेत हे सर्व साहित्य आहे. सुर ए फातिहाला फातेहातुल किताब,सुरतुल हम्द, उम्मुल कुरआन,उम्मुल किताब, अस्सबुल मसानी,सुरतुल कंज,सुरतुल वाकिया, सुरतुल काफिया, सुरतुस्सशिफा, सुरतुस्स शाफिआ, सुरतुददुआ, सुरतुल मुनाजात देखील म्हटले जाते.

हेही वाचा – सोलापूर-दौंड रेल्वे डेमो गाडी प्रवाशांसाठी ठरत आहे डोकेदुखी! वाचा सविस्तर..

करमाळा येथे हरभरा हमीभाव खरेदी केंद्र सुरू; शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

कुरआन शरीफ मधील सर्वश्रेष्ठ सुरत म्हणून हिचा उल्लेख होतो.सुरए फातिहा सर्व प्रकारच्या आजारासाठी उपयुक्त असून पाण्यावर दम करून रुग्णाला पाजल्यास आराम मिळतो.
रमजान महिन्यामध्ये प्रत्येक नेक कार्य सत्तर पट पुण्य प्राप्त करुन देणारे असते म्हणून या महिन्यात जास्तीत जास्त वेळ कुरआन पठनासाठी दिला जातो.
(क्रमश:)
———————————-
*✒️सलीमखान पठाण*
श्रीरामपूर
*9226408082.*

litsbros

Comment here