करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

मंडल अधिकारी यांची कारवाई एकतर्फी; करमाळा तालुक्यातील शिक्षक करणार आमरण उपोषण

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मंडल अधिकारी यांची कारवाई एकतर्फी; करमाळा तालुक्यातील शिक्षक करणार आमरण उपोषण

केम (प्रतिनिधी); तहसीलदार यांनी रस्ता मंजूर केलेल्या आदेशाची केम मंडल अधिकारी यांच्याकडून एकतर्फी कारवाई करून अन्याय केल्यामुळे वडशिवणे तालुका करमाळा येथील शिक्षक सुहास काळे हे दिनांक 5 एप्रिल पासून करमाळा तहसील समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

त्या निवेदनात म्हटले आहे की, मी वडशिवणे तालुका करमाळा येथील रहिवासी असून वडशिवणे हद्दीतील गट नंबर 64 /2 मध्ये २००१ पासून कुटुंबासहित वास्तव्यास आहे त्या ठिकाणाहून आज पावे तो कोणताही रस्ता अस्तित्वात नाही व गट नंबर 67 मधील ब्रह्मदेव काळे यांनी तहसीलदार साहेब यांच्याकडे रस्ता मिळावा म्हणून अर्ज दाखल केला होता.

सन 2013 मध्ये तहसीलदार करमाळा यांच्याकडून गट नंबर 68 च्या उत्तर बांधावरून पाच फूट व गट नंबर 64 च्या दक्षिण बांधावरून पाच फूट असा रस्ता मंजूर झाला त्यानंतर दिनांक २१/३/२०२३ पर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारचा रस्ता केला नाही किंवा वहिवाट देखील केले नाही परंतु अचानक दिनांक 21/03/2023 रोजी अचानक मंडळ अधिकारी तलाठी भाऊसाहेब हे पोलीस बंदोबस्त घेऊन आले आमचे कोणतेही म्हणणे न ऐकता रस्ता आदेश दोन्ही गटाच्या बांधावरून पाच फूट असताना जबरदस्ती करून फक्त आमच्या एकट्याच्या शेतातून सुमारे 12 ते 14 फुटी रुंदीचा रस्ता तयार केला.

हेही वाचा – आ.संजयमामा शिंदे यांची रस्त्याच्या दुर्दशेमुळे तारांबळ होऊ नये म्हणून.. ‘जनशक्ती’ संघटनेने हाती घेतले रस्त्याचे काम; जनशक्तीची गांधीगिरी!

करमाळा तालुक्यातील रब्बी हंगाम आला अंतिम टप्प्यात; मजुरांची कमतरता, हार्वेस्टर मशीनने उरकला गहू!

त्यामध्ये आमच्या उभ्या पिकाची नुकसान झाले व पिकांना पाणी देण्यासाठी असणारा पाठ देखील मोडून टाकण्यात आला याच्या निषेधार्थ दिनांक 5 एप्रिल पासून करमाळा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

या नियोजनाच्या प्रती माननीय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर माननीय उपजिल्हाधिकारी साहेब कुर्डवाडी माननीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील महाराष्ट्र राज्य मुंबई याना पाठवले आहेत.

litsbros

Comment here