करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

पोलिस भरतीमध्ये करमाळा तालुक्यातील योद्धा करिअर ॲकॅडमीचा झेंडा; तब्बल 41 विद्यार्थी यशस्वी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पोलिस भरतीमध्ये करमाळा तालुक्यातील योद्धा करिअर ॲकॅडमीचा झेंडा; तब्बल 41 विद्यार्थी यशस्वी

करमाळा(प्रतिनिधी); यावर्षीच्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये करमाळा तालुक्याच्या विविध गावातील अनेक तरुणांनी पोलिस भरतीमध्ये यशस्वी होऊन यश संपादन केले असुन गावागावातून त्यांच्या कौतुक व अभिनंदनाचे फलक झळकू लागले आहेत.

यामध्ये सुभेदार मेजर विलास नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झरे व मोशी पुणे येथे सुरू असलेल्या नाईकनवरे बंधुच्या योद्धा ॲकडमी मधील‌41 विद्यार्थी यशस्वी झाल्याने या केंद्राच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांना जिवनात आनंद निर्माण करण्याचे काम झाले आहे.

करमाळा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी यावर्षीची पोलीस भरती वरदान ठरली असून तालुक्यातील शंभर पेक्षा जास्त तरुण- तरुणी यावर्षीच्या भरतीमध्ये यशस्वी ठरत अनेकांनी आपल्यावरील बेरोजगारीचा कलंक पुसण्यात यशस्वी ठरले आहेत तर अनेकांनी चार पाच वर्षे केलेले परिश्रम फळाला आले आहेत.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील गृहमंत्री झाल्यानंतर पोलीस भरती प्रक्रियेची पुनर्रचना करून त्यांनी यामध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला याचा फायदा आजपर्यंत राज्याच्या ग्रामीण भागातील अनेक तरुणांना झाला गुणवत्ता व परिश्रमाच्या जोरावर अनेकांना पोलीस दलामध्ये स्थान मिळाले आहे.

करमाळा तालुक्यात बारावी‌ ते पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले अनेक बेरोजगार तरुण गेल्या सात – आठ वर्षांपासून स्थानिक पोलीस भरती मार्गदर्शन केंद्र व स्वतःच्या घरीच राहून पोलीस भरती चा सराव करत होते.

हेही वाचा – करमाळा तालुक्यातील वंजारवाडीच्या लेकीची UPSC मध्ये बाजी; देशात 530 वा क्रमांक पटकावला

व्याख्याते जगदीश ओहोळ यांचा माजी सनदी अधिकारी इ झेड खोब्रागडे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मान!

यामध्ये अनेकांची घरची परिस्थिती साधारण असल्याने कोणत्याही स्थितीत यशस्वी होणे गरजेचे होते. अशा सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी गेल्या काही वर्षांपासून पोलीस भरतीचा पर्याय दिलासादायक ठरत होता. केल्या दोन-तीन वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांनी भरती पुढे ढकलण्याचे प्रकार होत होते.

त्यामुळे हे तरुण निराशेच्या गर्दीत जाऊ लागले होते परंतु यावर्षी सरकारने घेतलेल्या धाडसी निर्णयांनी मुळे सर्वच जिल्हा व शहर कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस दलामध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली यामध्ये तालुक्यातील योद्धा पोलिस भरती प्रशिक्षण केंद्रातील 41 विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत.

त्यांच्या अभिनंदनचे फलक गावोगावच्या वेशी मध्ये जळकू लागले आहेत गावातील इतर तरुणांसाठी ते प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरू लागले आहेत.
यात आपल्या करमाळा तालुक्यातील 31 व तालुका बाहेरील 10 आसे एकूण 41 विद्यार्थी भरती झाले आहेत.

litsbros

Comment here