करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील मोरांची संख्या लागली घटू ; वाचा, तालुक्यातील पक्षी निरीक्षक काय म्हणतात?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील मोरांची संख्या लागली घटू ; वाचा, तालुक्यातील पक्षी निरीक्षक काय म्हणतात?

केत्तूर (अभय माने) ” नाच रे मोरा…” हे बालगीत ऐकले की, थुई… थुई…. नाचणाऱ्या मोरांच्या पिसाऱ्यांची आठवण होते.सध्या मोरांची संख्या वरचेवर कमी झाल्यामुळे उजनी पाणलोट पट्ट्यात (बागायती भागात)दिसणारे हे मोर सध्या दुर्मिळ झाले आहेत.

काही वर्षांपूर्वी करमाळा तालुक्यातील नंबर 1, केत्तूर नंबर 2 , गोयेगाव, पोमलवाडी, खातगाव, कात्रज, जिंती या भागात मोरांचे मोठे वास्तव्य होते. परंतु ही संख्याही वरचेवर कमी झाल्याने आता मोर दिसणेही अवघड झाले आहे.केत्तूर येथील दादासाहेब निकम व अँड.संतोष निकम यांच्या शेताजवळील घराजवळ गेल्या आठवडाभरापासून रोज सकाळी मोरांची मादी एक लांडोर मात्र दिसत आहे.

मोरांची संख्या कमालीची घटल्यामुळे वनविभागाने याबाबत उपाय योजना करावी अशी मागणी पक्षीप्रेमी तसेच पक्षी अभ्यासकातून होत आहे.

राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोराकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने मोरांचे अस्तित्व नामशेष होत आहे.करमाळा तालुक्याच्या उजनी बागायती परिसरात मोरांची संख्या कमी होऊ लागली आहे मोरांचे प्रजनन वाढविण्यासाठी वनविभागाने तसेच शासनाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे अन्यथा मोर राष्ट्रीय पक्षी आगामी काळात चित्रातूनच पहावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.आधुनिक शेतीचे नावाखाली शेतात होणाऱ्या वेगवेगळ्या रासायनिक फवारण्यामुळेही मोरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

” शेतीव्यवसात झालेला आमूलाग्र बदल मोरांच्या अस्तित्वावर विपरीत परिणाम झाला आहे. तांत्रिक शेतीमुळे मोरांचे अधिवास धोक्यात आले आहे. शेतीमुळे माणूस शेतात वस्ती करून राहायला आल्यामुळे कुत्र्यांकडूनही मोर त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी चोरून शिकारी होत असते. मानवनिर्मित अनेक समस्यांमुळे मोरांची संख्या घटत चालली आहे.
– डॉ.अरविंद कुंभार,ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक

मोर हा कुक्कटवर्गीय पक्षी असून आकर्षक रंगाच्या सुंदर पक्षाला राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता मिळाली आहे. मोराचा विणीचा हंगाम हा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच असतो साधारणपणे मे महिन्यापासून ते जून अखेरपर्यंत लांबलचक पिसारा असणाऱ्या मोरांचा नाच प्रेक्षणीय असतो.
– कल्याणराव साळुंके,पक्षी अभ्यासक,करमाळा

“मोरांचे तीन प्रकार आहेत. दोन आशियाई प्रजाती भारतीय उपखंडातील मोर भारतीय मोर.आणि दक्षिण पूर्व आशियातील हिरवा मोर तसेच आफ्रिकेच्या कांगो खोऱ्यातील मोर
– .राहुल इरावडे,पक्षीप्रेमी,केत्तूर

” वृक्ष तोडीमुळे जंगलातील मोर मानवी वस्तीमध्ये येत आहेत. त्यामुळे वस्तीमध्ये पाळीव कुत्र्यांकडून होत असलेल्या हल्ल्याने तसेच आपल्या घरातील शोभा वाढविण्यासाठी मोरांच्या पिसांचा वापर होत असल्याने मोरांची शिकार मोठ्या प्रमाणात होत आहे. या सर्व कारणांमुळे सध्या मोरांची संख्या कमी होत आहे.
– संतोष धाकपाडे, सचिव, वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन सोलापूर

हेही वाचा – साहेब झालात.. सामाजिक बांधिलकी व सेवावृत्ती भाव कायम जपा, न्यायाच्या बाजूने भक्कम उभे रहा; जेऊर येथे यशवंत विद्यार्थ्यांना DYSP अजित पाटील यांचा सल्ला

पोलिस उपनिरीक्षक झालेल्या शेतकऱ्याच्या मुलाची करमाळा तालुक्यातील सोगाव येथे ग्रामस्थांनी काढली घोड्यावरून सवाद्यासह मिरवणूक

“वारंवार बदलणाऱ्या हवामानाचा मोरांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होत आहे तसेच वृक्षांची संख्या कमी झाल्याने सुरक्षित स्थळ म्हणून मोर विजेचा खांब, टावर यावर बसण्याला पसंती देत आहेत.
– शिवानंद हिरेमठ, पक्षी निरीक्षक, सोलापूर

litsbros

Comment here