शिक्षक भारती संघटनेची करमाळा तालुका कार्यकारिणी जाहीर; तालुकाध्यक्षपदी..
केम( प्रतिनिधी संजय जाधव); शिक्षक भारती संघटना सोलापूर वतीने आज नामदेवराव जगताप विद्यालय, झरे ता. करमाळा येथे “सभासद नोंदणी व पदाधिकारी निवड कार्यक्रम” संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री रवींद्र नामदेव सपकाळ, सचिव न्यू यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ सालसे हे होते.
या कार्यक्रमात लाल बहादूर शास्त्री विद्यालय, सालसे येथील सहशिक्षक विजयकुमार गुंड यांची करमाळा तालुकाध्यक्षपदी निवड जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांच्या हस्ते करण्यात झाली.
त्याचबरोबर उपाध्यक्षपदी किशोर जाधवर, सचिव पदी सचिन गाडेकर सर व कोषाध्यक्ष पदी गोरख ढेरे सर यांच्याही निवडी करण्यात आल्या.
याप्रसंगी करमाळा तालुक्यातील विविध शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सूजितकुमार काटमोरे, जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार देवकते, उपाध्यक्ष शाहू बाबर, शरीफ चिककळी, प्राथमिक शहराध्यक्ष मेटकरी, सचिव नितीन रुपनर तसेच उपस्थित होते.
हेही वाचा – देवाच्या कार्यक्रमाला चाललेल्या भक्तांच्या गाडीचा वीट जवळ अपघात
कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालय झरे येथील मुख्याध्यापक रामहरी घाडगे यांनी केले.
Comment here