करमाळासोलापूर जिल्हा

आ.संजयमामा शिंदे यांची रस्त्याच्या दुर्दशेमुळे तारांबळ होऊ नये म्हणून.. ‘जनशक्ती’ संघटनेने हाती घेतले रस्त्याचे काम; जनशक्तीची गांधीगिरी!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आ.संजयमामा शिंदे यांची रस्त्याच्या दुर्दशेमुळे तारांबळ होऊ नये म्हणून.. ‘जनशक्ती’ संघटनेने हाती घेतले रस्त्याचे काम; जनशक्तीची गांधीगिरी!

करमाळा (प्रतिनिधी);
माढा तालुक्यातील ३६ गावे व करमाळा तालुक्याला जोडणारा शिवाय करमाळा मतदार संघाचे विद्यमान लोकप्रतिनिधी संजयमामा शिंदे यांच्या गावापासून करमाळ्याकडे जाणारा म्हणजे निमगाव टें. ते उपळवाटे – केम रस्ता अत्यंत खराब झाला होता. या रस्त्यासाठी शासन व प्रशासनाकडून शिवाय आजी-माजी लोकप्रतिनिधी कडून या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत गेले.

रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय व खड्डेयुक्त असल्याने शेतकरी, दूधवाले, शाळकरी मुले अशा वाटसरूंना जाण्या येण्यासाठी प्रचंड त्रास होत होता.

शिवाय दर शुक्रवारी आ. संजयमामा शिंदे यांनाही या रस्त्यावरून जाताना येताना तारेवरची कसरत करावी लागत होती. म्हणून अतुल खूपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनशक्ती संघटनेच्या वतीने श्रमदान आज या रस्त्यावर मुरूम भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. श्रमदानातून डागडुजी होत असलेल्या या रस्त्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसहित शेकडो गाववाल्यांनी हातभार लावला, अनेकांनी ट्रॅक्टर, डिझेल, टिपर, जेसीबी अशा मशिनींचे सहकार्य केले.

माढा तालुक्यातील निमगाव टें ते उपळवाटे – केम रस्तावर भले मोठे खड्डे पडले होते. खराब रस्त्यामुळे या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला नाही. किंबहुना आजी-माजी लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार संजय शिंदे यांचा हा नेहमीचाच रस्ता. ते या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देतील अशी अशाअपेक्षा वाटसरूंना लागली, मात्र कार्यकाळ संपत आला तरी देखील या रस्त्याला निधी उपलब्ध होऊ शकत नाही.

त्यांना स्वतःला देखील या रस्त्यावरून जाताना येताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीची होणारी ही हेळसांड पाहून जनशक्ती संघटनेने श्रमदानातून हा रस्ता तयार करण्याचे हाती घेतले.

दरम्यान जनशक्तीच्या या श्रमदान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वादविवाद होऊ नये यासाठी अगोदरपासूनच पोलीस पथक तैनात होते. शिवाय उप अभियंता पी.के., शाखा अभियंता आर. व्हि. डेंगले, मंडलाधिकारी एस.सि. डिकोले, तलाठी एल. जि.मोगल, ग्रामसेवक एच.ए.बनाते आधी प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

यांनीही उत्तरदायित्व दाखवत ठेकेदाराकडून पाणी मारण्यासाठी टँकर, व टाकलेल्या मुरमावर फिरवण्यासाठी रोलरची तजवीज केली.

हे श्रमदान आंदोलन यशस्वी करण्यासाठी माढा लोकसभा शिवसेनेचे नेते संजय कोकाटे, माजी सरपंच सतिश शिरस्कर, माजी उपसरपंच प्रकाश खूपसे, संपर्कप्रमुख रेश्मा राऊत, संपर्क प्रमुख गणेश वायभासे, नितीन जगताप, आबा मस्के, बिबीशन शिरसाट, राज कणसे, बाबाराजे कोळेकर, गणेश ढोबळे, शरद एकाड, अतुल राऊत, बालाजी तरंगे, रामराजे डोलारे,

बापू धोत्रे, मोहन गायकवाड, विजय खुपसे, दीपक खूपसे, विशाल खूपसे, शुभम गायकवाड, अक्षय देवडकर, कल्याण गवळी, रोहन नाईकनवरे, वैभव मस्के, साहेबराव विटकर, विशाल खूपसे, दत्तात्रय खूपसे, संतोष खूपसे, दीपक खूपसे, गणेश सुनील खूपसे, अभिमान गायकवाड , संजय मोळ्या जाधव, लक्ष्मण जाधव, दिलीप जाधव, सुरेश देवडकर, प्रभाकर घाडगे, हनुमंत चव्हाण, राजाभाऊ देवडाकर ,नवनाथ जाधव ,अशोक जाधव, शिवाजी जाधव, सुनील जाधव, सचिन घाडगे सुहास देवडकार संजय माळी गणेश माळी,शरद सपाटे,संतोष सपाटे,वैभव काळे व मोठया संखेने ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा – करमाळा तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा, रब्बी पिकाचे नुकसान; नुकसान भरपाईची भिगवन

सोलापूर-दौंड-सोलापूर या नवीन गाडीचे पारेवाडी येथे जंगी स्वागत; कुठल्या स्थानकावर किती वाजता असेल गाडी? वाचा क्लिक करून

टक्केवारीमुळे कामे व्यवस्थित होत नाहीत
– रस्त्याच्या कामासाठी निधी मिळाल्यावर ठेकेदाराकडून अधिकारी व लोकप्रतिनिधी सुद्धा टक्केवारी घेतात. त्यामुळे साहजिकच ठेकेदारांना दुय्यम कॉलिटी ची कामे करून बिले काढावी लागतात. याचा मनस्ताप जनतेला होतो. ज्या जनतेने मतं टाकून या लोकांना निवडून दिले आहे, त्या जनतेला त्रास देण्याचे पाप लोकप्रतिनिधी कडून होत आहे ही दुर्दैवाची बाब आहे.

अतुल खूपसे पाटील
संस्थापक जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य

litsbros

Comment here