करमाळासोलापूर जिल्हा

खासदार निंबाळकर यांचा करमाळा दौरा उजनी दुर्घटनेतील कुटुंबीय व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घेतली भेट

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

खासदार निंबाळकर यांचा करमाळा दौरा

उजनी दुर्घटनेतील कुटुंबीय व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घेतली भेट

करमाळा प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे दि. 27 मे रोजी करमाळा दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यांनी कुगाव येथे उजनी जलाशयात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्या डोंगरे व अवघडे कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली.

शासन दरबारी प्रयत्न करून दुर्घटनाग्रस्त जाधव, अवघडे कुटूंबीयांच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त शासकीय मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी कुटुंबीयांना दिली.

 करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे वादळी वाऱ्यामुळे व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करून महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत लवकरात लवकर नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करावे अशा सूचना दिल्या.

हेही वाचा – पाणी पिण्यासाठी गेलेली गाय उजनीच्या गाळात फसली; मच्छीमारांच्या सतर्कतेमुळे सुटका!

उन्हाळी सुट्ट्या.. एस् टी बसेसला गर्दीच गर्दी; अनेक बसेस नादुरुस्त.. करमाळा समस्यांचे आगार!

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे ,उपाध्यक्ष अफसर जाधव, रामभाऊ ढाणे , चिखलठाणचे माजी सरपंच चंद्रकांत काका सरडे, वाशिंबेचे सरपंच तानाजी बापू झोळ, उपसरपंच दादासाहेब सरडे, गणेश काळे, सचिन गायकवाड, दीपक गायकवाड यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

litsbros