कौतुकास्पद; करमाळा तालुक्यातील वांगीची सायली कारंडे प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात प्रथम!
केम (प्रतिनिधी संजय जाधव);
राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध परीक्षेत वांगी नंबर 3 येथील कुमारी सायली दीपक कारंडे या विद्यार्थिनीने 200 पैकी 200 मार्क मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
सायली सध्या जिल्हा परिषद शाळा निंबाळकर वस्ती वांगी 3 येथे दुसऱ्या इयत्तेत शिकत असून तिला या परीक्षेसाठी श्री महेश साळुंखे गुरुजी यांचे मार्गदर्शन मिळाले तिने मिळवलेल्या यशाबद्दल गटविकास अधिकारी श्री मनोज राऊत साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री राजकुमार पाटील साहेब ,विस्तार अधिकारी नलवडे साहेब ,केंद्रप्रमुख श्री तोडमल सर ,मुख्याध्यापक श्री ठाकर गुरुजी ,शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांकडून सायलीचे कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातील मुले ही राज्यात प्रथम क्रमांक मिळवू शकतात हे सायलीने दाखवून दिले आहे जिद्द, चिकाटी, मेहनत व योग्य मार्गदर्शन असेल तर यश मिळवणे अवघड नाही.
व्याख्याते जगदीश ओहोळ यांचा माजी सनदी अधिकारी इ झेड खोब्रागडे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मान!
कुमारी सायली ही कारंडे सर व भाग्यश्री कारंडे मॅडम यांची कन्या असून या दोघांनीही लहानपणापासूनच आपल्या मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण केली आहे. यामुळे कारंडे कुटुंबीयांचे परिसरातून कौतुक होत आहे.
Comment here